बिग बॉस मराठी २ : फॅन्सनी घरातल्या 'या' व्यक्तीला म्हटले, ‘कुलेस्ट’सदस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 07:15 AM2019-06-01T07:15:00+5:302019-06-01T07:15:00+5:30

दुस-या सीझनमध्ये ही आठवडा पूर्ण व्हायच्या अगोदरच घरात भांडणांना सुरुवात झालेली पाहायला मिळतेय. पण या सगळ्यात फक्त एक व्यक्ती अपवाद ठरतेय.

fans called maithili javkar is coolest contest in bigg boss house | बिग बॉस मराठी २ : फॅन्सनी घरातल्या 'या' व्यक्तीला म्हटले, ‘कुलेस्ट’सदस्य

बिग बॉस मराठी २ : फॅन्सनी घरातल्या 'या' व्यक्तीला म्हटले, ‘कुलेस्ट’सदस्य

googlenewsNext
ठळक मुद्देघरात मैथिलीने कोणावर एकदाही आवाज चढवला नाहीयंचाहत्यांनी तिच्या शांतपणे खेळण्याचं कौतुक केलंय

बिग बॉसच्या घरात भांडण-तंटे होणं आता नवीन नाही. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात अनेक वाद-विवाद आणि टोकाची भांडणं पाहायला मिळाल्यावर, आता दुस-या सीझनमध्ये ही आठवडा पूर्ण व्हायच्या अगोदरच घरात भांडणांना सुरुवात झालेली पाहायला मिळतेय. पण या सगळ्यात फक्त एक व्यक्ति अपवाद आहे आणि ती म्हणजे अभिनेत्री मैथिली जावकर.


बिग बॉसच्या घरात आल्यापासून मैथिलीला भांडण तर सोडाच, पण एकदाही आवाज चढवून बोलताना, किंवा एखाद्याविषयी गॉसिप करतानाही दिसली नाहीयं. म्हणूनच कदाचित मैथिलीच्या चाहत्यांनी तिला सोशल मीडियावरून ‘सर्वाधिक कुलेस्ट कंटेस्टंट’ म्हटलेलं आहे.

काही प्रेक्षकांनी तर तिच्या शांतपणे खेळण्याचं कौतुक करताना ‘किप काम आणि प्ले बिग बॉस’ अशी शाबासकीही दिलेली आहे. मैथिलीच्या ह्या ‘कुल’ स्वभावानेच तिच्याबाबत गैरसमज करून पहिल्या नॉमिनेशनच्या वेळी काही सदस्यांनी तिला नॉमिनेट केले. पण मैथिलीला नशिबीची साथ मिळाल्याने ती नॉमिनेशनमधून सेफ झाली.

 
पहिल्या टास्कवेळीही मैथिली शांतपणे खेळताना दिसली. आणि हिच तिची जमेची बाजू असल्याचे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. बाकी सदस्यांनी अभिजीत बिचुकले ‘व्हिलन’ बनवल्यावरही मैथिलीने मात्र एकदाही त्याच्याविषयी अपशब्द वापरला नसल्याबद्दलही मैथिलीचे चाहते तिची पाठ थोपटत आहेत. आणि ती घराची पहिली कॅप्टन होण्यासाठीही पात्र असल्याचे म्हणत आहेत.
 

Web Title: fans called maithili javkar is coolest contest in bigg boss house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.