एका क्लासिक सिनेमाचं मातेरं करू नका रे..., ‘आनंद’च्या रिमेकची घोषणा होताच भडकले फॅन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 05:47 PM2022-05-20T17:47:16+5:302022-05-20T17:53:19+5:30
Anand Remake: ‘आनंद’चा रिमेक बनणार म्हटल्यावर चाहत्यांना आनंद व्हायला हवा. पण प्रत्यक्षात चाहते नाराज आहेत. ‘आनंद’ सारख्या क्लासिक सिनेमाचा रिमेक बनवण्याची कल्पना चाहत्यांना फार काही आवडली नाही.
Anand Remake: 51 वर्षांआधी प्रदर्शित झालेला ‘आनंद’ (Anand) हा एक यादगार सिनेमा.राजेश खन्ना (Rajesh Khanna) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) या सुपरहिट जोडीच्या अभिनयाने सजलेल्या 70 च्या दशकातील या सुपरहिट सिनेमाच्या आठवणी आजही सिनेप्रेमींच्या मनात जिवंत आहेत. ‘आनंद’ रिलीज होऊन 50 पेक्षा अधिक वर्ष झालीत आहेत आणि आता इतक्या वर्षानंतर बॉलिवूडमध्ये याचा रिमेक बनवण्याची घोषणा झाली आहे. समीर सिप्पी यांनी आजोबा एनसी सिप्पीच्या या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक बनवण्याचं जाहिर केलं आहे. ‘आनंद’चा रिमेक बनणार म्हटल्यावर चाहत्यांना आनंद व्हायला हवा. पण प्रत्यक्षात चाहते नाराज आहेत. ‘आनंद’ सारख्या क्लासिक सिनेमाचा रिमेक बनवण्याची कल्पना चाहत्यांना फार काही आवडलेली नाही.
OFFICIAL REMAKE OF 'ANAND' ANNOUNCED... #Anand - one of the most iconic films starring #RajeshKhanna and #AmitabhBachchan, directed by #HrishikeshMukherjee - will be remade by the original producer - #NCSippy’s grandson #SameerRajSippy - along with producer #VikramKhakhar. pic.twitter.com/DdhxZrRXDz
— taran adarsh (@taran_adarsh) May 19, 2022
1971 मध्ये रिलीज झालेला ‘आनंद’ हा सिनेमा एनसी सिप्पी यांनी प्रोड्यूस केला होता. आता एनसी यांचा नातू समीर राज सिप्पी यांनी या चित्रपटाच्या रिमेकची घोषणा केलेली आहे. अद्याप स्क्रिप्टवर पूर्ण झालेली नाही. स्टारकास्टही फायनल झालेली नाही. पण ‘आनंद’चा रिमेक बनवण्यावर समीर सिप्पी ठाम आहे. ‘आनंद’ची कथा नव्या पिढीसमोर यायला हवी, असं त्यांचं मत आहे. पण चाहते मात्र यामुळे भडकले आहेत.
DONT TOUCH!!!
— Jitendra (@hydbadshah) May 19, 2022
Classics ko kyu bigadne pr pade ho agar talent hi hai toh Original script likh kr dikhao!!!
— siddhant (@donationking13) May 19, 2022
भडकले लोक
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ‘आनंद’चा रिमेक येणार, असं ट्विट केलं आणि हे ट्विट पाहून नेटकरी भडकले. सोशल मीडियावर अनेकांनी यावर टीका केली. ‘आनंद’सारख्या क्लासिक सिनेमाचं मातेरं करू नका, अशा आशयाच्या प्रतिक्रिया नेटकºयांनी दिल्या. आजच्या काळात राजेश खन्ना, जॉनी वॉकर, ललिता पवार सारखे कलाकार आणणार कुठून? असा सवाल एका चाहत्याने केला. इतक्या सुंदर चित्रपटाचा रिमेक बनवण्याची गरज नाही. कृपा करून या नितांत सुंदर चित्रपटाचा कचरा करू नका, अशी कमेंट एका युजरने केली.
Dear Bollywood, Please don't ruin the classic movie.
— महेश दुलाल (@mahesh_dulal) May 19, 2022
No one can match #Anand .The characters were amazing and all actors did such an amazing job. How will you find another Rajesh Khanna , Johnny Walker ,Lalita Pawar ,Ramesh Deo and his wife ?How will anyone make and replace those soulful songs ?Please don't spoil the film .
— Deepak (@drdeepak1382) May 19, 2022
‘आनंद’मध्ये राजेश खन्ना यांनी एका कॅन्सर पीडिताची भूमिका केली होती. तर अमिताभ हे डॉक्टरच्या भूमिकेत होते. डॉक्टर आणि रुग्ण त्यांच्यातील मैत्रीचं नातं. आनंदचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन या साºया गोष्टी दिग्दर्शक ऋषीकेश मुखर्जी यांनी प्रभावीपणे मांडल्या होत्या. या चित्रपटातील ‘बाबूमोशाय जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नही, हा संवाद चांगलाच लोकप्रिय झाला होता.