"तुम्ही रोहितचा बायोपिक करा", मराठी अभिनेत्याला चाहत्याचा सल्ला, उत्तर देत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 01:34 PM2024-07-13T13:34:01+5:302024-07-13T13:35:36+5:30

चाहत्याने एका मराठी अभिनेत्याला रोहित शर्माची भूमिका साकारताना बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

fans want this marathi actor to do rohit sharma biopic and play cricketers role | "तुम्ही रोहितचा बायोपिक करा", मराठी अभिनेत्याला चाहत्याचा सल्ला, उत्तर देत म्हणाला...

"तुम्ही रोहितचा बायोपिक करा", मराठी अभिनेत्याला चाहत्याचा सल्ला, उत्तर देत म्हणाला...

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा हा स्टार फलंदाज आहे. १७ वर्षांनी टी २० वर्ल्ड कपवर भारताचं नाव कोरणाऱ्या रोहितचा चाहता वर्गही मोठा आहे. आता चाहत्यांना रोहित शर्मावर बायोपिक बघायचा आहे. या बायोपिकमध्ये चाहत्यांनी एका मराठी अभिनेत्याला रोहितची भूमिका साकारताना बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हा अभिनेता म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून  सुयश टिळक आहे. 

अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये काम करून सुयशने मराठी सिनेइंडस्ट्रीत स्वत:च वेगळं स्थान निर्माण केलं. विविधांगी भूमिका साकारणाऱ्या सुयशने प्रेक्षकांची मनंही जिंकून घेतली आहेत. का रे दुरावा या मालिकेतून सुयश घराघरात पोहोचला. या मालिकेने त्याला प्रसिद्धीझोतात. यानंतर अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिकांमध्ये तो दिसला. पण, आता चाहत्यांना त्याला रोहित शर्माची भूमिका साकारताना बघायचं आहे. सुयशने इन्स्टावर नुकतंच चाहत्यांबरोबर askme सेशन घेतलं होतं. 

या सेशनमध्ये एका चाहत्याने त्याला रोहित शर्माच्या बायोपिकमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केली. "जर रोहित शर्मावर बायोपिक बनवला तर तुम्ही ऑडिशन द्या...तुम्ही रोहितसारखे दिसता सर", असं चाहता म्हणाला. या चाहत्याला सुयशने रिप्लाय देत "ओके नक्की" असं म्हटलं आहे. या स्टोरीमध्ये त्याने रोहित शर्माला टॅगही केलं आहे.  दरम्यान, अलिकडेच सुयश अबोली मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला. त्याने 'बापमाणूस', 'पुढचं पाऊल', 'दुर्वा', 'जाऊ नको दूर बाबा', 'सख्या रे' या मालिकांमध्ये काम केलं आहे. 

Web Title: fans want this marathi actor to do rohit sharma biopic and play cricketers role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.