"राखी सावंत 'मैं हू ना'च्या ऑडिशनला बुरखा घालून आलेली होती, तो काढला अन् आतमध्ये.."
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 07:02 PM2024-03-10T19:02:17+5:302024-03-10T19:03:43+5:30
फराह खानने सांगितला राखी सावंतचा भन्नाट किस्सा
Rakhi Sawant In Main Hoon Na: राखी सावंतला कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. काही लोक तिला कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणतात, तर काही लोक तिला ड्रामा क्वीन अन् बिनधास्त लेडी म्हणतात. पण राखीशी संबंधित प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होणे ही एक सामान्य गोष्ट आहे. नुकतीच फराह खाननेही (Farah Khan) एका मुलाखतीदरम्यान राखीबद्दल एक वेगळीच गोष्ट सांगितली. तिने अनेक वर्ष जुन्या 'मैं हूँ ना'च्या ऑडिशनशी संबंधित एक आठवण सांगितली. फराहने सांगितले की राखी त्यावेळी ऑडिशनला बुरखा घालून आली होती. त्यामागे कारण काय, पुढे काय घडलं... जाणून घेऊया.
फराह खानने कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांना दिलेल्या मुलाखतीत 'मैं हूं ना'च्या ऑडिशनशी संबंधित गोष्ट शेअर केली आहे. दार्जिलिंगमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यानंतर २ दिवसांनी राखी सावंतही शूटिंगसाठी आल्याचा खुलासा तिने केला. यापूर्वी या भूमिकेसाठी दुसऱ्या मुलीला कास्ट करण्यात आले होते. मात्र त्या अभिनेत्रीच्या आईने आपल्या मुलीची, शाहरुख ज्या हॉटेलमध्ये राहिल, त्याच हॉटेलमध्ये राहायची सोय करावी, असा आग्रह धरला. शुटिंगपूर्वीच असे नखरे पाहून फराहने विचार बदलला.
राखी सावंत बुरखा घालून पोहोचली...
फराहने सांगितले की राखी बुरखा घालून ऑडिशनला आली होती. मग तिने बुरखा काढला तेव्हा सगळे बघतच राहिले. कारण राखीने बुरख्याखाली बिकिनी घातली होती. यानंतरही राखीचे कास्टिंग नाही झाले. कारण तिची हेअरस्टाइल केशरी रंगाची होती. त्यामुळे तिला लगेच कास्ट करण्यात आले नाही. फराहने राखीला एक स्वेटर दिला आणि म्हणाली की तू अशीही क्यूट दिसशील. त्यानंतर तिला कास्ट करण्यात आले आणि त्यानंतर राखीसोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता, असे फराह म्हणाली.