"माझ्या मुलाला सिनेमात घे", निर्मात्याने फराह खानला दिलेली १० कोटींची ऑफर; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 04:19 PM2024-11-10T16:19:59+5:302024-11-10T16:20:40+5:30

'हॅपी न्यू इयर' सिनावेळेस फराह खानला आलेला अनुभव

Farah Khan was offered 10 crores by a producer to cast his son in the movie | "माझ्या मुलाला सिनेमात घे", निर्मात्याने फराह खानला दिलेली १० कोटींची ऑफर; म्हणाली...

"माझ्या मुलाला सिनेमात घे", निर्मात्याने फराह खानला दिलेली १० कोटींची ऑफर; म्हणाली...

फराह खान (Farah Khan) बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर, फिल्ममेकर आहे. सध्या फराह तिच्या युट्यूब चॅनलवरील व्हिडिओंमुळेच चर्चेत असते. फराह खानला 'मै हू ना' सिनेमामुळे खूप यश मिळालं. तिने हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. एकदा एका निर्मात्याने मुलाला कास्ट कर म्हणून फराहला १० कोटींची ऑफर दिली होती. ही ऑफर फराहने नाकारली होती. काय आहे का किस्सा वाचा.

फराह खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जाकीर खानच्या शोमध्ये तिने ही घटना सांगितली. यामध्ये ती म्हणते,"तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हॅपी न्यू इयर सिनेमावेळी एका निर्मात्याने मला फोन केला होता. त्याच्या लेकाला सिनेमात घेण्यासाठी त्याने मला १० कोटींची ऑफर दिली होती. झाँसी की रानी बनत मी म्हटलं की मी असं कधीच करणार नाही. मी सिनेमासोबत अन्याय होऊ देणार नाही. मी ऑफर घेतली असती आणि हे शाहरुखला समजलं असतं तर काय झालं असतं? मी असं कधीच करु शकत नाही. मी त्या सिनेमात विवान शाहला (नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा) कास्ट केलं. कारण तो त्या भूमिकेसाठी अगदी योग्य होता."

फराह खानच्या 'हॅप्पी न्यू इयर' सिनेमात शाहरुख खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, बोमन ईरानी, सोनू सूद हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. हा फराहचा दिग्दर्शिका म्हणून शेवटचा सिनेमा. यानंतर तिने अद्याप एकही सिनेमा दिग्दर्शित केलेला नाही. सध्या फराह सलमानसोबत आगामी 'सिकंदर' साठी हाय एनर्जी ट्रॅक तयार करत आहे.

Web Title: Farah Khan was offered 10 crores by a producer to cast his son in the movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.