तब्बूच्या बहिणाचा विंदू दारा सिंगवर जडला होता जीव, लग्न केलं आणि काही वर्षांतच मोडला संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 10:12 AM2023-11-18T10:12:16+5:302023-11-18T10:13:47+5:30

तब्बूची मोठी बहीण फराह नाजने अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. फराह नाझने 1996 मध्ये बिंदू दारा सिंहसोबत लग्न केलं होतं.

farah naaz married to vindu dara singh and got divorced read tabu elder sister love story | तब्बूच्या बहिणाचा विंदू दारा सिंगवर जडला होता जीव, लग्न केलं आणि काही वर्षांतच मोडला संसार

तब्बूच्या बहिणाचा विंदू दारा सिंगवर जडला होता जीव, लग्न केलं आणि काही वर्षांतच मोडला संसार

तब्बू ही बॉलिवूडची सुपरस्टार आहे. पण तब्बूची मोठी बहीण देखील बॉलिवूडची टॉप हिरोईन राहिली आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. तब्बूची मोठी बहीण फराह नाजने अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. फराह नाझने 1996 मध्ये बिंदू दारा सिंहसोबत लग्न केलं होतं.


विंदू दारा सिंगचा आज वाढदिवस असून तो ज्येष्ठ अभिनेते दारा सिंग यांचा मुलगा आहे. विंदूने बिग बॉस या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवले असून त्याने अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. पण त्याला म्हणावे तसे अभिनयक्षेत्रात यश  मिळाले नाही. विंदू त्याच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा कॉन्ट्रोव्हर्सींमुळे जास्त चर्चेत असतो. विंदूने नव्वदीच्या दशकातील  प्रसिद्ध अभिनेत्री फराह नाझसोबत लग्न केले होते. पण काहीच वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला.

विंदूचे पहिले लग्न अभिनेत्री फराह नाझ सोबत झाले होते. पण काहीच वर्षांत त्यांनी घटस्फोट घेतला. फराह ही नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने गोविंदासोबत तर अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. ती अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण आहे. फराह गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. विंदू दारा सिंग आणि फराह यांची ओळख नव्वदीच्या दशकात एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. विंदू आणि फराह काहीच महिन्यात एकमेकांच्या प्रेमात पडले. पण त्यांच्या दोघांच्याही घरातील मंडळी या नात्याच्या विरोधात होते.

त्याचदरम्यान विंदू त्याच्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तामीळनाडूला गेला होता. त्यामुळे त्या दोघांचा एकमेकांशी काहीही संपर्क नव्हता. पण या दुराव्यामुळेच आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही हे त्या दोघांना जाणवले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कुटुंबियांनी देखील लग्नासाठी परवानगी दिली. त्यांना लग्नानंतर एकच वर्षांत मुलगा झाला. सगळे काही सुरळीत सुरू असताना त्यांच्यात वाद व्हायला लागले आणि २००२ मध्ये फराह मुलाला घेऊन दुसरीकडे राहायला लागली आणि त्यांनी घटस्फोट घेतला.

फराहसोबत घटस्फोट घेतल्यानंतर बिंदू दारा सिंगने डायना उमरोवासोबत लग्न केले. डायना एक मॉडेल आणि बिझनेसमन आहे. बिंदू दारा सिंहने डायनाशी २००९ मध्ये लग्न केले. दोघांनाही मुलगी आहे. 

Web Title: farah naaz married to vindu dara singh and got divorced read tabu elder sister love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.