फरहान अख्तरच्या 'तुफान'चा धडाकेबाज ट्रेलर झाला रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 12:39 PM2021-06-30T12:39:16+5:302021-06-30T12:40:16+5:30

फरहान अख्तरचा 'तुफान' चित्रपट १६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Farhan Akhtar's smash hit 'Tufan' trailer released | फरहान अख्तरच्या 'तुफान'चा धडाकेबाज ट्रेलर झाला रिलीज

फरहान अख्तरच्या 'तुफान'चा धडाकेबाज ट्रेलर झाला रिलीज

googlenewsNext

अभिनेता फरहान अख्तरचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट तुफानचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओच्या सहकार्याने एक्सेल एन्टरटेनमेंट आणि आरओएमपी पिक्चर्सच्या साथीने प्रस्तुत, रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा निर्मित तुफान प्रेरणादायक कथा उलगडणार आहे. या सिनेमात फरहान अख्तरसोबत मृणाल ठाकूर, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसेन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राझ हे कलाकार झळकणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले आहे. 

'तुफान'च्या धडाकेबाज ट्रेलरमध्ये स्थानिक गुंडाच्या जीवनप्रवासाचे दर्शन घडते. डोंगरीच्या रस्त्यावर एका अनाथ मुलाचा जन्म होतो. मोठेपणी हा स्थानिक गुंड बनतो. त्याची ओळख हुशार आणि प्रेमळ तरुणी, अनन्यासोबत होते आणि जीवनच बदलून जाते. ती त्याला योग्य मार्ग दाखवते. प्रेम आणि मार्गदर्शनाच्या जोरावर हा तरुण आपले नशीब आजमावतो. एक जागतिक किर्तीचा बॉक्सर म्हणून त्याला लौकिक मिळतो. ही एक प्रेरणादायी कथा यात रेखाटण्यात आली आहे.  एकाच वेळी हिंदी आणि इंग्रजीत अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणारा तुफान हा पहिलीच चित्रपट आहे. हा चित्रपट १६ जुलैला अॅमेझॉन प्राइमवर पहायला मिळणार आहे.


ट्रेलर लाँचवेळी फरहान अख्तर म्हणाला की, , मी तुफानच्या खऱ्या अर्थाने प्रेमात आहे. एखादी व्यक्ती शरीराने कितीही बळकट असलो तरीही बॉक्सर असणे, हे काही येरा गबाळ्याचे काम नव्हे. या व्यक्तिरेखेच्या भूमिकेत शिरताना मला ८ ते ९ महिने अविश्रांत कष्ट घ्यावे लागले. बॉक्सिंग हा खेळ शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तुमची कसोटी पाहणारा खेळ आहे. आम्ही घेतलेली मेहनत स्क्रीनवर पाहण्यासाठी मी फार उत्सुक आहे.”


परेश रावल म्हणाला की, “एखादा प्रोजेक्ट नवीन असताना फारच आव्हानात्मक वाटते. एका बॉक्सिंग प्रशिक्षकाची भूमिका निभावणे फारच आव्हानात्मक होते. एक अभिनेता म्हणून मला प्रोत्साहन मिळाले. तुफान प्रत्येक टप्प्यावर आव्हान देणारा आहे. एखाद्याने हार पत्करू नये हे सांगणारा आहे. हा एक परिपूर्ण मनोरंजनपट आहे. त्यात थरार आहे, विचार प्रवर्तक आहे आणि प्रेरणा देणारा ठरेल.”


अभिनेत्री मृणाल ठाकूर म्हणाली की, “राकेश ओमप्रकाश मेहरा, परेश रावल आणि फरहान अख्तर यांच्या समवेत काम करण्याची संधी मिळणे म्हणजे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणे. सात वर्षांपूर्वी राकेश यांनी फेसबुक मेसेज पाठवून माझ्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, हे मला आठवते. आज ते प्रत्यक्षात घडते आहे. अशा रोमांचक सिनेमाचा भाग असल्याने चंद्रावर पोहोचल्याचा भास होतो. माझ्या कारकीर्दीच्या या टप्प्यावर इतक्या उत्तम कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळणे म्हणजे स्वप्न साकार होण्यासारखे आहे. मी याहून उत्तम किंवा प्रेरणादायी कलाकारांचा विचारच करू शकत नाही.”

Web Title: Farhan Akhtar's smash hit 'Tufan' trailer released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.