‘बाप आखिर बाप होता है’

By Admin | Published: May 17, 2017 04:42 AM2017-05-17T04:42:34+5:302017-05-17T04:42:34+5:30

प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते, आपल्या मुलाने आपले नाव उज्ज्वल करावे. पण ही गोष्ट प्रत्येक मुलाला जमतेच असे नाही. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार आहेत, ज्यांची मुले

'Father is the father after all' | ‘बाप आखिर बाप होता है’

‘बाप आखिर बाप होता है’

googlenewsNext

- Geetanjali Ambre

प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते, आपल्या मुलाने आपले नाव उज्ज्वल करावे. पण ही गोष्ट प्रत्येक मुलाला जमतेच असे नाही. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार आहेत, ज्यांची मुले त्यांच्या अभिनयाचा वारसा पुढे चालवण्यात अपयशी ठरली आहेत. वडिलांच्या किंवा कुटुंबीयांमुळे त्यांना बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला खरा; पण त्याला त्यांना यशात बदलता आले नाही. एक नजर टाकूया अशाच काही स्टार्सवर....

अध्ययन सुमन
छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा शेखर सुमनने आपल्या अभिनयाची छाप दोन्ही ठिकाणी पाडली आहे. शेखर सुमन याचा मुलगा अध्ययन सुमनच्या वाट्याला मोठ्या कष्टाने एकच चित्रपट आला होता, तो म्हणजे ‘हाल-ए-दिल’. या चित्रपटात त्याने चांगला अभिनय केला होता. मात्र, यानंतर त्याला एकही चित्रपट मिळाला नाही. ‘हाल-ए-दिल’नंतर त्याचा बॉलिवूड करिअरला ब्रेकच लागला.

तुषार कपूर
तुषार कपूरने २००१ मध्ये आलेल्या ‘मुझे कुछ कहना है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. एव्हरग्रीन स्टार असलेल्या जितेंद्र यांचा सुपुत्र असलेल्या तुषारला वडिलांप्रमाणे प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचवता आले नाही. ‘गोलमाल सिरीज’ आणि ‘शोर-इन द सिटी’ हे चित्रपट वगळता इतर चित्रपटांत तुषारला आपली छाप पाडता आली नाही. आजही यश मिळवण्यासाठी तुषार स्ट्रगल करताना दिसतोय.

उदय चोप्रा
बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते दिवंगत यश चोप्रा यांचा मुलगा उदय चोप्रा याची बॉलिवूडमध्ये दणक्यात एंट्री झाली. शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश असलेल्या ‘मोहब्बतें’ या चित्रपटातून त्याने डेब्यू केला खरा. पण, त्याचा फारसा फायदा त्याच्या करिअरसाठी झाला नाही. यानंतर त्याने यशराज बॅनरच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले; पण याही चित्रपटांमध्ये त्याला अभिनय मात्र काही केल्या जमलाच नाही. ‘धूम’ सारखा चित्रपट उदयच्या वाटेला आला; पण त्यानंतरही त्याच्या करिअरला स्पीड आला नाही.

फरदीन खान
‘प्रेम अगन’ या १९९८ साली आलेल्या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेला फरदीन खान हा प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक फिरोज खान यांचा मुलगा आहे. आपल्या १२ वर्षांच्या बॉलिवूड करिअरमध्ये फरदीनने ‘जंगल’, ‘प्यार तूने क्या किया’, ‘फिदा’ आणि ‘आॅल द बेस्ट’ सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले. पण, तरीही तो बॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप पाडण्यात अयशस्वी ठरला.

सिकंदर खेर
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता अनुपम खेर आणि किरण खेर यांचा मुलगा सिकंदर खेर चित्रपटात आपलं नाणं काही खणखणीत वाजवू शकला नाही. त्याने ‘वूडस्टक व्हीला’ या चित्रपटातून इंडस्ट्रीत प्रवेश केला. मात्र, हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर चांगलाच आपटला. यानंतर तो ‘प्लेअर्स’ या मल्टिस्टारर चित्रपटातही झळकला. पण, तोही चित्रपट त्याच्या करिअरला दिशा देऊ शकला नाही.

Web Title: 'Father is the father after all'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.