रणवीर सिंगच्या '८३' चित्रपटात झळकणार ही 'फेमिना मिस इंडिया'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 06:45 PM2020-02-18T18:45:46+5:302020-02-18T18:46:35+5:30

फेमिना मिस इंडिया २०१५ आणि मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व करणारी ही मॉडेल बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

'Femina Miss India' to be featured in Ranveer Singh's '83' film | रणवीर सिंगच्या '८३' चित्रपटात झळकणार ही 'फेमिना मिस इंडिया'

रणवीर सिंगच्या '८३' चित्रपटात झळकणार ही 'फेमिना मिस इंडिया'

googlenewsNext

फेमिना मिस इंडिया २०१५ आणि मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व करणारी मॉडेल अदिती आर्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. दिग्दर्शक कबीर खानच्या '८३' या चित्रपटातून  ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्यावर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगकपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. 


अदिती आर्याने दाक्षिणात्य चित्रपटात काम केले असून तिने तिच्या अदा व अभिनय कौशल्याने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. तिने 'सेव्हन', 'आयएसएम' आणि 'कुरुक्षेत्र' या लोकप्रिय दाक्षिणात्य चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. याव्यतिरिक्त तिने हिंदी वेब सीरिज 'तंत्र' आणि 'स्पॉटलाईट'मध्ये सुद्धा काम केले आहे. 


त्यानंतर आता ती बॉलिवूडमध्ये डेब्यू करते आहे. तिला चक्क रणवीर सिंग आणि जास्त स्टारकास्ट असणारा सिनेमा म्हणजेच ८३मध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. 


या मिळालेल्या संधीबद्दल ती म्हणाली की, 'मला या चित्रपटाचा पहिल्यापासून एक भाग व्हायचं होतं, कारण त्यात भारताला अभिमान वाटणारा ऐतिहासिक क्षण आहे. मी स्वतःला खूप नशीबवान समजते की माझ्या करियरच्या सुरुवातीलाच मला एवढ्या मोठ्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. कबीर खानसारख्या दिग्दर्शकासोबत काम करणे म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे.'


'८३' चित्रपटात रणवीर सिंगसोबत दीपिका पादुकोण, पंकज त्रिपाठी, साकीब सलीम, बोमन इराणी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १० एप्रिल २०२०ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: 'Femina Miss India' to be featured in Ranveer Singh's '83' film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.