'तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता...', अंगावर शहारे आणणारा 'फायटर'चा ट्रेलर एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 03:23 PM2024-01-15T15:23:57+5:302024-01-15T15:28:04+5:30

 देशभक्ती भावना जागृत करणारा हा ट्रेलर आहे.

Fighter Official Trailer is out| Hrithik Roshan, Deepika Padukone, Anil Kapoor, Siddharth Anand | 'तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता...', अंगावर शहारे आणणारा 'फायटर'चा ट्रेलर एकदा पाहाच

'तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता...', अंगावर शहारे आणणारा 'फायटर'चा ट्रेलर आऊट!

'फायटर' सिनेमा प्रचंड चर्चेत आला आहे. देशभक्तीवरील या सिनेमाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. आता या चित्रपटाचा  अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हृतिक आणि दीपिकाची डॅशिंग लूक ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय.  देशभक्ती भावना जागृत करणारा हा ट्रेलर आहे. ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. 

"फायटर वो नहीं है जो अपने टार्गेट अचिव्ह करता हैं, वे है जो उन्हें ठोक देता है" या हृतिकच्या डायलॉगनं "फायटर" या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते. ३ मिनिटे ९ सेंकद असलेल्या फायटरच्या ट्रेलरमध्ये दहशतवादी पुलवामा हल्ला आणि इतर भीषण दृश्ये दिसत आहेत.  हा चित्रपटाचा टर्निंग पॉइंट आहे. ट्रेलरमध्ये एकापेक्षा एक दमदार डॉयलॉग आहेत.  ट्रेलरमध्ये वायुसेनेचा थरारही बघायला मिळतोय.  

अंगावर शहारे आणणारे  एरियल अ‍ॅक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत.पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणाऱ्या दीपिका आणि हृतिकची केमिस्ट्री चाहत्यांना आवडली आहे. हृतिक रोशनने फायटरचा ट्रेलर इन्स्टाग्रामवर शेअर केला.  त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, "दिल आसमान के नाम, और जान देश के नाम । जय हिन्द!".  हृतिकनं शेअर केलेल्या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

'फायटर'च्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले, तर हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्याशिवाय या चित्रपटात अक्षय ओबेरॉय, करण सिंग ग्रोव्हर, आकर्ष अलग आणि संजीदा शेख यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'फायटर'चे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे.  तर सिनेमाची निर्मिती ही वायकॉम 18 स्टुडिओच्या बॅनरखाली केली गेली आहे.  येत्या 25 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त 'फायटर' थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Fighter Official Trailer is out| Hrithik Roshan, Deepika Padukone, Anil Kapoor, Siddharth Anand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.