फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 03:53 PM2024-09-30T15:53:11+5:302024-09-30T15:55:21+5:30
कंगना राणौतने नुकतेच मुंबईतील पाली हिल्समधील आपले ऑफिस 32 कोटी रुपयांना विकले आहे...
चित्रपट अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता तथा भाजप खासदारकंगना राणौत, सध्या तिचा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी' मुले जबरदस्त चर्चेत आहे. तिने नुकतीच एक लँड रोव्हर रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी एलडब्ल्यूबी नावाची एक नवीन SUV कार खरेदी केली आहे. लँड रोव्हर कंपनीची ही एसयूव्ही फिल्मस्टारची फेव्हरीट असल्याचे मानले जाते. आता ही लग्झरी एसयूव्ही कंगनाच्या गॅरेजची शान बनली आहे. कंगना राणौतने नुकतेच मुंबईतील पाली हिल्समधील आपले ऑफिस 32 कोटी रुपयांना विकले असून अता स्वत:साठी ही खास लक्झरी एसयूव्ही खरेदी केली आहे.
कंगनाची नवी एसयूव्ही ₹3 कोटींहून अधिक महागडी -
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात टॅलेन्टेड अभिनेत्रींपैकी एक असलेली कंगना सध्या चित्रपटांमध्ये फारशी यशस्वी ठरत नसली तरी, राजकीय व्यासपीठावर ती तिच्या विधानांमुले सातत्याने चर्चेत राहते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारम म्हणजे, तिने खरेदी केलेली नवीन लक्झरी SUV लँड रोव्हर रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी लॉन्ग व्हीलबेस. या एसयूव्हीची मुंबईतील ऑन-रोड किंमत 3 कोटी रुपयांहूनही अधिक आहे.
कंगनाच्या न्याव्या एसयूव्हीची खासियत -
कंगनाच्या नव्या रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी एसयूव्हीमध्ये 3.0 लीटरचे 6 सिलिंडर पेट्रोल इंजिन लागलेले आहे. जे 394 बीएचपी एवढी पॉवर आणि 550 न्यूटन मीटरचा पिक टॉर्क जनरेट करते. या एसयूव्हीमध्ये 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळते. महत्वाचे म्हणजे, ही कार 5.9 सेकंदांत 0-100 किलोमीटर प्रति तास एवढा वेग धारण करते. हिची टॉप स्पीड 242 kmph एवढी आहे.
इतर फीचर्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, या एसयूमध्ये 13.1 इंचाचे इन्फोटेनमेंट सिस्टिम, 13.7 इंचाचे डिजिटल ड्राइव्हर डिस्प्ले, रियर सीट एंटरटेनमेंट स्क्रीन, 35-स्पीकर मेरिडियन साउंड सिस्टम, हेड अप डिस्प्ले, मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल आणि 9 एअरबॅग्जसह इतरही जबरदस्त पीचर्स आहेत.
कंगनाचे लक्झरी कार कलेक्शन -
अॅक्ट्रेस कंगना रनौतकडे बऱ्याचशा लक्झरिअस कार आहेत. यात ब्रँड न्यू लँड रोव्हर रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी एलडब्ल्यूबीसोबतच, 3.5 कोटी रुपयांची मर्सिडीज मेबॅच एस 680, 1.5 कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू 7 सीरीज 730 एलडी, मर्सिडीज बेंझ जीएलई 350 यांचा समावेश आहे. एक कोटी रुपयांपेक्षाही अधिकची महाग मर्सिडीज बेंझ जीएलई 350डी आणि 50 लाख रुपयांपेक्षा अधिक महागडी ऑडी क्यू3 देखील आहे.