पूनम पांडेविरोधात गुन्हा अन् मिलिंद सोमणला प्रशंसा ...! अपूर्व असरानी यांना खटकला ‘दुटप्पीपणा’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 03:48 PM2020-11-05T15:48:47+5:302020-11-05T15:49:14+5:30
पूनम पांडेने गोव्यात अश्लिल व्हिडीओ शूट केला आणि मिलिंद काय तर न्यूड होऊन समुद्रकिनारी धावला.
सध्या गोवा प्रचंड चर्चेत आहेत. कारण काय तर मिलिंद सोमण आणि पूनम पांडे. या दोघांनीही गोव्याच्या समुद्र किनारी अशी काही ‘आग’ लावली की, देशभर चर्चा झाली. पूनम पांडेने गोव्यात अश्लिल व्हिडीओ शूट केला आणि मिलिंद काय तर न्यूड होऊन समुद्रकिनारी धावला. यापैकी अभिनेत्री पूनम पांडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मात्र मिलिंदच्या बाबतीत उलटेच झाले. त्याला न्यूड पाहून लोकांनी त्याच्या बॉडीची प्रशंसा केली. ही गोष्ट लेखक अपूर्व असरानी यांना ‘ नेमकी खटकली.
काय म्हणाले अपूर्व
#PoonamPandey & #MilindSoman both stripped down to their birthday suits in #Goa recently. Pandey partly, Soman completely. Pandey is in legal trouble--for obscenity. Soman is being lauded for his fit body at age 55. I guess we are kinder to our nude men than to our nude women. 🤔 pic.twitter.com/qQ9UFQIYXJ
— Apurva (@Apurvasrani) November 4, 2020
अपूर्व असरानी यांनी मिलिंद आणि पूनम दोघांचाही फोटो पोस्ट करत, याप्रकरणी लोकांच्या दुटप्पी वागण्यावर प्रश्न उपस्थित केला. ‘अलीकडे पूनम पांडे आणि मिलिंद सोमण दोघांनीही गोव्यात कपडे उतरवले. पूनमने अर्धे तर मिलिंद अख्खे कपडे उतरवले. यानंतर पूनम पांडे कायद्याच्या कचाट्यात सापडली आणि मिलिंदला मात्र 55 च्या वयात इतका फिट दिसतो म्हणून प्रशंसा मिळाली. माझ्या मते, महिलांच्या न्यूड होण्याच्या तुलनेत पुरूषांनी न्यूड होण्याबाबती आपला समाज अधिक उदार आहे,’अशा आशयाची पोस्ट अपूर्व यांनी शेअर केली.
पूनम पांडेला अटक
गोव्यात अश्लिल व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी पोलिसांनी पूनम पांडेविरोधात एफआयआर दाखल केली. तिचा हा वादग्रस्त व्हिडीओ गोवा सरकारच्या पाटबंधारे खात्याच्या चापोली धरणावर शूट करण्यात आला. या व्हिडीओवर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला होता. सध्या कोविडच्या काळात धरणावर जाण्यासाठी सामान्य माणसाला बंदी असताना अशा प्रकारच्या शूटिंगला कशी परवानगी दिली जाते असा आक्षेप घेण्यात आला होता. याप्रकरणी पूनम पांडेला उत्तर गोवा पोलिसांनी सिकरी येथील पंचतारांकित हॉटेलमधून अटक केली आहे.
मिलिंदच्या बॉडीवर सेलिब्रिटीही फिदा
Now this is why I like Twitter! https://t.co/aeTk8TsHLR
— Kavita Kaushik (@Iamkavitak) November 4, 2020
नुकताच मिलिंदचा 55 वा वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या दिवशी मिलिंदने गोव्याच्या समुद्रकिनारी न्यूड होऊन धावतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र त्याच्या या फोटोवर आक्षेप घेण्याऐवजी लोकांनी त्याच्या फिट बॉडीची प्रशंसा केली. अभिनेत्री कविता कौशिकही मिलिंदच्या या फोटावर फिदा झाली. याचमुळे मला टिष्ट्वटर आवडते, असे कविताने मिलिंदचा फोटो पोस्ट करत लिहिले.