खऱ्या नावावर चित्रपटांची निर्मिती

By Admin | Published: October 11, 2015 04:01 AM2015-10-11T04:01:40+5:302015-10-11T04:01:40+5:30

काही दिवसांपूर्वी आमीर खान ज्या वेळी मीडियासमोर आला तेव्हा त्याच्या नावाने बॉलीवूडमध्ये एक चित्रपट तयार झाला आहे हे जाणून आश्चर्यचकित झाला. २००८मध्ये प्रदर्शित झालेल्या

Films produced on the real name | खऱ्या नावावर चित्रपटांची निर्मिती

खऱ्या नावावर चित्रपटांची निर्मिती

googlenewsNext

काही दिवसांपूर्वी आमीर खान ज्या वेळी मीडियासमोर आला तेव्हा त्याच्या नावाने बॉलीवूडमध्ये एक चित्रपट तयार झाला आहे हे जाणून आश्चर्यचकित झाला. २००८मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून राजकुमार गुप्ता यांनी (नो वन किल्ड जेसिका फेम) सुरुवात केली होती आणि छोट्या पडद्यावरील मोठे स्टार म्हणून ओळख असलेले राजीव खंडेलवाल यांनी चित्रपटात आमीरची भूमिका केली होती.

आमीर खान एकटाच नाही की, ज्याच्या नावाने एक असा चित्रपट तयार झाला ज्याच्याशी त्यांचा दूरपर्यंत काहीच संबंध नव्हता. शाहिद कपूरलादेखील खूप दिवसांपर्यंत याची माहिती नव्हती की, शाहिद नावाने एक हिंदी चित्रपट तयार झाला आहे. हंसल मेहता दिग्दर्शित चित्रपट शाहिद मुंबईच्या एका वकिलाची कथा होती आणि त्यामध्ये राजकुमार रावने मुख्य भूमिका केली होती. विशेष म्हणजे शाहिद आणि आमीरप्रमाणेच अनेक दुसऱ्या कलाकारांच्या नावानेदेखील असे चित्रपट तयार झाले आहेत. रामगोपाल वर्मा यांनी मै माधुरी दीक्षित बनना चाहती हूं चित्रपट केला होता. ज्यामध्ये अंतरा माळीने अभिनय केला होता. या चित्रपटाचा माधुरी दीक्षित-नेनेच्या नावाव्यतिरिक्त दुसरा कोणताच संबंध नव्हता. प्रसिद्ध चित्रकार एम.एफ. हुसेन यांनी मीनाक्षी नावाने चित्रपट तयार केला होता, ज्याचा मीनाक्षी शेषाद्री यांच्याशी काही संबंध नव्हता. नरगीस नावानेदेखील चित्रपट तयार झाला होता. तर संजय दत्तच्या नावानेही एक चित्रपट आला होता, ज्यामध्ये अयूब खान अभिनेता होते. या चित्रपटाचे केवळ दत्तसोबत नाव मिळतेजुळते होते. याशिवाय संजूबाबाचा या चित्रपटाशी काही संबंध नव्हता. दोन अशा चित्रपटांचेही नाव आहे, ज्यांचे स्टार मंडळींशी संबंध आहे. रोहित शेट्टी यांच्या बोल बच्चनमध्ये अभिषेक अभिनेता होता तर अमिताभ बच्चन क्लायमॅक्समध्ये केवळ एका गाण्यात दिसले होते. दिग्दर्शक म्हणून मकरंद देशपांडे यांनी एक चित्रपट तयार केला होता, ज्याचे नाव होते शाहरूख बोला खूबसूरत है तू. राजकुमार नावाने तीन वेळा चित्रपट तयार झाले, मात्र कोणत्याच चित्रपटाचा जानी राजकुमारसोबत काही संबंध नव्हता. १९६४मध्ये प्रथम राजकुमारचे अभिनेता शम्मी कपूर होते, तर १९९६मध्ये आलेल्या राजकुमारचे अभिनेता अनिल कपूर आणि २०१३मध्ये आलेल्या राजकुमारचे अभिनेता शाहिद कपूर होते. करिना करीना नावाने अनेक वर्षांपूर्वी झी टीव्हीवर एक मालिका आली होती, तर करिना कपूरने म्हटले होते की, तिच्या नावाचा गैरफायदा घेण्यासाठी या शोचे असे नाव ठेवले आहे. नंतर कसे तरी या प्रकरणाला मिटविले गेले. अशा प्रकारांमध्ये सनी देओल एक अपवादासारखा आहे, ज्याने सनी नावाच्या चित्रपटात मुख्य भूमिका केली होती. १९९६मध्ये अजय नावाने चित्रपट आला होता, ज्यामध्ये सनी देओलसोबत करिश्मा कपूरची जोडी होती आणि चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील दर्शन यांनी केले होते.

- anuj.alankar@lokmat.com

Web Title: Films produced on the real name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.