अखेर लक्ष्मीकांत बेर्डे यांचे हे स्वप्न होणार पूर्ण; बेर्डे कुटुंबाने केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 01:32 PM2021-12-17T13:32:54+5:302021-12-17T13:36:12+5:30

लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांच्या १७व्या स्मृतीदिनी बेर्डे कुटुंबियांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

Finally, Laxmikant Berde's dream will come true; Berde family made a big announcement | अखेर लक्ष्मीकांत बेर्डे यांचे हे स्वप्न होणार पूर्ण; बेर्डे कुटुंबाने केली मोठी घोषणा

अखेर लक्ष्मीकांत बेर्डे यांचे हे स्वप्न होणार पूर्ण; बेर्डे कुटुंबाने केली मोठी घोषणा

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचे १६ डिसेंबर, २००४ साली अकाली निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली होती. मराठी चित्रपट, त्यातील कलाकार, तंत्रज्ञ यांना नेहमीच मदत करण्याचे काम लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केले होते. त्यांचे हे कार्य अविरत सुरू राहावे यासाठी बेर्डे कुटुंबियांनी त्यांच्या १७ व्या स्मृतीदिनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे आणि त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे आणि त्यांची मुले अभिनय आणि स्वानंदी बेर्डे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत लक्ष्य कला मंचची स्थापना केली आहे. याबाबत प्रिया बेर्डे यांनी पोस्ट शेअर केले आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, १६ डिसेंबर २०२१ रोजी लक्ष्मीकांतच्या १७व्या पुण्यतिथी निमित्त "लक्ष्य कला मंच"ची स्थापना झाली. गेली १७ वर्ष आम्ही ही संस्था उभारण्याचा आणि लक्ष्मीकांत ची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत होतो, पण अनेक अडचणी, मनुष्यबळाचा अभाव इ. गोष्टींना तोंड देत प्रयत्नांनती परमेश्वर या नुसार आम्ही यशस्वी झालो.


त्यांनी पुढे म्हटले की, महाराष्ट्रातल्या अनेक शहरात, खेड्यापाड्यात, गावात अनेक प्रतिभाशाली व होतकरू कलाकार आहेत की ज्यांना योग्य मार्ग व व्यासपीठ मिळत नाही, शिक्षण मिळत नाही अश्या कलाकारांसाठी एखादी अकादमी, संस्था उभी करावी हे लक्ष्मीकांतचे स्वप्नं होतं आणि यासाठीच लक्ष्य कला मंचची स्थापना झाली. त्याचबरोबर लक्ष्य कला मंच जो कुणी कलाकारांवर अन्याय करेल,मग ती पैशांची फसवणूक असेल किंवा महिला कलाकार व कर्मचाऱ्यांनशी गैरवर्तणूक त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून आळा घालेल, महाराष्ट्रातील कानाकोपर्यातील कलाकारांच्या पाठीशी हा मंच ठाम पणे उभा राहील.

कलेवरच्या प्रेमासाठी व कलाकारांच्या हक्कासाठी एकत्र येऊ
हा मंच स्थापन करण्यात ज्यांचा मोठा आणि महत्वाचा वाटा आहे ते म्हणजे माझे सहकारी व बिझनेस पार्टनर श्रीमंथ एंटरटेनमेंट प्रा.ली व धनंजय माने इथंच राहतातचे निर्माते, पोलीस बॉईज ऑर्गनायझेशन चे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष, ग्राहक सेवा संस्था चे कार्याध्यक्ष, हॉटेल मराठमोळा झटका व हॉटेल चख लेचे मालक अमर गवळी, सौ. सायली अमर गवळी, शैलेंद्र परदेशी, माझे संपर्क प्रमुख आणि सल्लागार धनंजय वाठारकर, संतोष जी साखरे हे होत. महाराष्ट्रातल्या तमाम कलाकारांना आमचे आवाहन आहे की त्यांनी लक्ष्य कला मंच मध्ये सामील व्हावं, "कलेवरच्या प्रेमासाठी व कलाकारांच्या हक्कासाठी " आपण एकत्र येऊ. लवकरच वेबसाईट व हेल्पलाईन नंबर येईल. अधिक माहिती साठी खालील नंबर वर संपर्क साधावा. धनंजय वाठारकर- 8888440058, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Finally, Laxmikant Berde's dream will come true; Berde family made a big announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.