OMG! भर रस्त्यात फाटली विकी कौशलचा भाऊ Sunny Kaushal ची पँट, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 03:45 PM2024-08-13T15:45:16+5:302024-08-13T15:46:01+5:30

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहचलेल्या सनी कौशलची पॅन्ट भर रस्त्यात फाटली.

fir aayi haseen dilruba sunny kaushal his pants ripped in promotion Taapsee Pannu, Vikrant Massey | OMG! भर रस्त्यात फाटली विकी कौशलचा भाऊ Sunny Kaushal ची पँट, व्हिडीओ होतोय व्हायरल

OMG! भर रस्त्यात फाटली विकी कौशलचा भाऊ Sunny Kaushal ची पँट, व्हिडीओ होतोय व्हायरल

'फिर आयी हसीन दिलरुबा' (Fir Aayi Haseen Dilruba) या चित्रपटाची सध्या मोठी चर्चा रंगली आहे. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि याबरोबरच कलाकारांचे अभिनय या सगळ्याची चर्चा रंगताना दिसत आहे. लोकप्रिय अभिनेता विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने (sunny kaushal) 'फिर आयी हसीन दिलरुबा'मधील आपल्या अभिनयाने सर्वांना अचंबित केलं आहे. पण, नुकतंच त्याला एका विचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. 

'फिर आयी हसीन दिलरुबा' च्या प्रमोशनसाठी टीम आणि स्टारकास्ट खूप मेहनत घेत आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहचलेल्या सनी कौशलची पॅन्ट भर रस्त्यात फाटली. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये पँट फाटल्याचा आवाज ऐकताच सनी म्हणताना दिसतो,"अरे यार, माझी पॅन्ट फाटली आहे".  पण, पॅनिक न होता सनीने उत्तमरीत्या परिस्थिती हाताळली. त्याने आपले जॅकेट कंबरेभोवती बांधले. जेणेकरून मागचा भाग झाकला जाईल आणि फाटलेली पँट दिसणार नाही.  


 'फिर आयी हसीन दिलरुबा' हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज झाला आहे.  हा चित्रपट 'हसीन दिलरुबा' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात विक्रांत मेसी आणि तापसी पन्नू हे मुख्य भूमिकेत असून सनी कौशलने अभिमन्यूच्या पात्रात प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या चित्रपटात तो तापसी पन्नूने निभावलेल्या राणी या पात्राच्या प्रियकराच्या भूमिकेत आहे. तर जिमी शेरगिल हा पोलिसाच्या भूमिकेत दिसून आला आहे. पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागालाही प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत.

Web Title: fir aayi haseen dilruba sunny kaushal his pants ripped in promotion Taapsee Pannu, Vikrant Massey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.