Adipurush : ‘आदिपुरूष’च्या पोस्टरचा वाद तापला, दिग्दर्शक ओम राऊत व कलाकारांविरोधात FIR

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 11:05 AM2023-04-05T11:05:15+5:302023-04-05T11:06:15+5:30

Adipurush: FIR filed against producer, director Om Raut : राम नवमीच्या मुहूर्तावर ‘आदिपुरूष’च्या मेकर्सनी सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज केलं होतं. आता याच पोस्टरमुळे ‘आदिपुरूष’चा दिग्दर्शक ओम राऊत तसेच चित्रपटातील कलाकारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

fir against adipurush director om raut cast prabhas kriti sanaon | Adipurush : ‘आदिपुरूष’च्या पोस्टरचा वाद तापला, दिग्दर्शक ओम राऊत व कलाकारांविरोधात FIR

Adipurush : ‘आदिपुरूष’च्या पोस्टरचा वाद तापला, दिग्दर्शक ओम राऊत व कलाकारांविरोधात FIR

googlenewsNext

Adipurush FIR filed against producer, director Om Raut : दिग्दर्शक ओम राऊत यांचा आगामी ‘आदिपुरूष’ (Adipurush) सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून नकारात्मक कारणानं चर्चेत आहे. राम नवमीच्या मुहूर्तावर ‘आदिपुरूष’च्या मेकर्सनी सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज केलं होतं. या पोस्टरवरही चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता याच पोस्टरमुळे ‘आदिपुरूष’चा दिग्दर्शक ओम राऊत तसेच चित्रपटातील कलाकारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनातन धर्माचे प्रचारक संजय दीनानाथ तिवारी यांनी मुंबईच्या साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्यामार्फत तक्रार दाखल करण्यात आली आहे.‘आदिपुरूष’च्या नव्या पोस्टरमध्ये हिंदू पौराणिक कथांचे पात्र चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले असून यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. 

तक्रारदार संजय दीनानाथ यांनी तक्रारीत म्हटल्यानुसार,  'रामचरित्रमानस' या पवित्र ग्रंथातील मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या चरित्रावर 'आदिपुरुष' सिनेमा बनवण्यात आला आहे. मात्र 'आदिपुरुष'च्या नवीन पोस्टरमध्ये प्रभू राम आणि अन्य पात्रांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये रामायणातील कलाकारांना जानवं न घालता दाखवण्यात आलं आहे आणि ते चुकीचे आहे. जाणव्याला हिंदू सनातनी धर्मात वेगळं महत्त्व आहे. शिवाय पोस्टरमध्ये सीता मातेच्या भूमिकेतील अभिनेत्री क्रिती सॅनॉनच्या भांगात कुंकू नाही. त्यामुळे तिला अविवाहित स्त्री दाखवण्यात आलं आहे. बॉलिवूड चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी हे जाणूनबुजून केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी आदिपुरुष दिग्दर्शक-निर्माता ओम राऊत आणि सर्व कलाकारांविरुद्ध आयपीसीच्या कलम २९५ (अ), २९८, ५००, ३४ अन्वये मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याआधी सोशल मीडियावरही या पोस्टरवर तीव्र टीका झाली होती. क्रितीच्या लुकवर सोशल मीडिया युजर्सनी आक्षेप घेतला होता. ‘आदिपुरूष’च्या पोस्टरमध्ये सीतेच्या भांगेत कुंकू नाही. नेमकी हीच बाब नेटकऱ्यांना खटकली होती. शिवाय हनुमानाच्या लुकवरही युजर्सनी संताप व्यक्त केला होता. 

गेल्या वर्षी आदिपुरुषचा टीझर रिलीज झाला होता आणि तो येताच वादात सापडला होता. त्यावरही जबरदस्त टीका झाली होती. आदिपुरूष’च्या टीझरला मिळालेला नकारात्मक प्रतिसाद पाहून मेकर्सने सिनेमाची रिलीज डेट बदलण्याचा निर्णय घेतला होता. आधी हा सिनेमा १२ जानेवारीलाच प्रदर्शित होणार होता. मात्र टीझर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर ओम राऊतच्या या सिनेमावर प्रचंड टीका झाली होती. टीझरमधील व्हीएफएक्स इफेक्टवरही लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. लोकांची ही नाराजी बघता मेकर्सनी व्हीएफएक्सवर आणखी मेहनत घेण्याचा निर्णय घेतला होता. आता हा सिनेमा येत्या 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा बिग बजेट चित्रपट हिंदी, तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभू श्री रामची भूमिका अभिनेता प्रभास साकारणार आहे. सैफ अली खानला रावणाच्या भूमिकेसाठी आणि चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी क्रितीची निवड करण्यात आली आहे.
 

Web Title: fir against adipurush director om raut cast prabhas kriti sanaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.