तारक मेहता फेम बबितावर अटकेची टांगती तलवार, अॅट्रॉसिटी प्रकरणात मुनमुन अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 11:57 AM2021-05-14T11:57:16+5:302021-05-14T12:03:20+5:30
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या टीव्हीवरच्या सर्वाधिक लोकप्रिय मालिकेतील बबीताजी अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) अडचणीत सापडली आहे.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या टीव्हीवरच्या सर्वाधिक लोकप्रिय मालिकेतील बबीताजी अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) अडचणीत सापडली आहे. रविवारी मुनमुनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात तिने जातीवाच शब्दांचा उल्लेख करत अपमानजनक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे तिच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरियाणामधील हांसीमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
First information report has been registered against the actress Munmun Dutta @ Babita ji at police station City Hansi under section 3(1) (u) of SC ST POA act.
— Rajat Kalsan رجت کلسن (@rajat53548936) May 13, 2021
Complaint is got registered by dalit rights activist Rajat kalsan. pic.twitter.com/Z7ZTfZXa54
नॅशनल अलायन्स फॉर दलित ह्यूमन राईट्सचे संयोजक रजत कालसन यांनी मुनमुनवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत अजामीनपत्र गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या प्रकरणी अटक झाल्यास तिला जामीन मिळणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
We are demanding @MumbaiPolice please take a strict action against her in SC/ST act. She is using inappropriate word for a particular society & hurt our sentiment. #ArrestMunmunDuttapic.twitter.com/kJPTy18Ccl
— Hansraj Meena (@HansrajMeena) May 10, 2021
काय आहे प्रकरण
मुनमुनने व्हिडीओत एका जातीवाचक शब्दाचा वापर केला होता. ‘मी युट्यूबवर येणार आहे आणि मला चांगले दिसायचे आहे. मला कुण्या ***** सारखे दिसायचे नाही,’ असे मुनमुन या व्हिडीओत म्हणताना दिसली़. तिचा हा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला आणि तो पाहताच लोकांनी तिला फैलावर घेतले. प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच मुनमुनने माफी मागितली. व्हिडीओतील एका शब्दाचा चुकीचा अर्थ काढला गेला. कुणाचाही अपमान करण्याचा, त्यांना धमकावण्याचा, कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. भाषेच्या अडचणीमुळे मी तो शब्द चुकीचा अर्थाने घेतला. पण माझी चूक लक्षात आणून देताच मी तो शब्द मागे घेतला. माझ्या मनात प्रत्येक जातीधर्माबद्दल समाजाबद्दल पूर्ण आदर आहे. अजानतेपणी झालेल्या या चुकीसाठी मी सर्वांची माफी मागते. मी कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर दिलगीरी व्यक्त करते, असे तिने तिच्या माफीनाम्यात लिहिले होते.
— Munmun Dutta (@moonstar4u) May 10, 2021