F.I.R ची चंद्रमुखी अडकली विवाहबंधनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2017 03:10 PM2017-01-28T15:10:30+5:302017-01-28T15:10:30+5:30
छोटया पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री एफआयआर फेम कविता कौशिक नुकतीच विवाह बंधनात अडकली.
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - छोटया पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री एफआयआर फेम कविता कौशिक नुकतीच विवाह बंधनात अडकली. केदारनाथ या पवित्र तीर्थस्थळी तिचा आणि प्रियकर रॉनित बिस्वासचा विवाहसोहळा संपन्न झाला. केदारनाथच्या सुंदर पर्वतरांगांमध्ये झालेल्या या विवाहाला दोघांचे कुटुंबिय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता.
विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास क्षण असतो. त्यामुळे प्रत्येकजण आयुष्यभर लक्षात राहिल अशा पद्धतीने विवाह करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. सेलिब्रिटी तर आलिशान विवाहसोहळयाला प्राधान्य देतात पण कविताने विवाहासाठी केदारनाथ तीर्थक्षेत्राची निवड करुन अनेकांना बुचकाळयात टाकले.
कविता आणि तिचा पती रॉनित महादेवाचे भक्त असल्याने त्यांनी कदाचित केदारनाथाची निवड केली असावी. विवाहामध्ये आलिशान, भपकेबाजपणा नसला तरी, विवाहस्थळाचे नैसर्गिक सौदर्य अनेकांच्या स्मरणात राहिल.