'तानाजी'नंतर अजय देवगणच्या आणखीन एका चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 07:58 PM2019-01-03T19:58:14+5:302019-01-03T19:59:05+5:30
नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अभिनेता अजय देवगणच्या एक नाही तर दोन सिनेमाचे फर्स्ट लूक प्रदर्शित झाले.
नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अभिनेता अजय देवगणच्या एक नाही तर दोन सिनेमाचे फर्स्ट लूक प्रदर्शित झाले. त्यातील एक चित्रपट म्हणजे 'तानाजी' व दुसरा 'दे दे प्यार दे'. 'दे दे प्यार दे' या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच सोशल मीडियावर पाहायला मिळाला.
अजय देवगणच्यातानाजी सिनेमाचे पोस्टर बुधवारी सकाळी रिलीज झाल्यानंतर त्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. यातील अजयचा लुक प्रेक्षकाच्या पंसतीस पडला आहे. त्यानंतर सायंकाळी दे दे प्यार देच्या अधिकृत अकाउंटवर एक ट्विट करण्यात आले आहे. यात अजयचा जबरदस्त लुक दिसून येत असून, तो दे दे प्यार दे मधील असल्याचे समजते. अकीव अली दिग्दर्शित आणि लव रंजन व टी सीरिजची निर्मिती असलेला हा सिनेमा १५ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Pyaar bharaa New Year aap sabhi ko.#DeDePyaarDepic.twitter.com/BwCA7O4FZ5
— De De Pyaar De (@DeDePyaarDe) January 1, 2019
अजयला तानाजीच्या भूमिकेत पाहणे, चाहत्यांसाठी कुठल्या भेटीपेक्षा कमी नसणार आहे. यात अजय एकदम वेगळ्या अवतारात दिसेल. अजय दीर्घकाळापासून या प्रोजेक्टवर काम करत होता. स्वत: अजय या चित्रपटाबद्दल कमालीचा उत्सूक आहे. कोंढाणा जिंकूण आणण्यासाठी तानाजींनी प्राणांची बाजी लावली होती. तानाजी हे बारा हजार हशमांचे (पायदळ) सुभेदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या काही सहकाऱ्यांनीदेखील शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य मिळवण्यासाठी लढण्याची शपथ घेतली होती. तानाजी हे शिवाजी महाराजांच्या या मौल्यवान सहकाऱ्यांपैकी एक होते. अजय देवगणला तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत पाहणे कमालीचे ठरणार आहे. 'तानाजी-द अनसंग वॉरियर' हा चित्रपट 29 नोव्हेंबर, 2019ला प्रदर्शित होणार आहे.