थलायवा रजनी सरांनी शूट केला पहिला सेल्फी व्हिडीओ
By Admin | Published: July 6, 2017 12:25 PM2017-07-06T12:25:40+5:302017-07-06T12:31:28+5:30
रजनीकांत यांनी अमेरिकेत पोहोचल्यावर फेरारीने प्रवास केला
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - दाक्षिणात्य सुपस्टार थलायवा रजनीकांत नियमित वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेला गेले आहेत. रजनीकांतच्या प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवणारे चाहते यामुळे थोडे चिंतेत आहेत. मात्र रजनीकांत यांची तब्ब्येत नेहमीप्रमाणे ठणठणीत आहे. याचा पुरावाच सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.रजनीकांत यांनी अमेरिकेत पोहोचल्यावर फेरारीने प्रवास केला. यावेळी त्यांनी शूट केलेला एक सेल्फी व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा -
रजनीकांत यांची सेल्फी व्हिडीओ शूट करण्याची ही पहिलीच वेळ असावी. कारण सेल्फी व्हिडीओ सुरु झाल्यानंतर रजनीकांत सोबत असलेल्या व्यक्तीला लाल बटण दाबायचं का विचारताना दिसत आहे. रजनीकांत म्हटल्यावर अशक्यप्राय असं काहीच नाही, मग ते काहीही का असेना. रजनीकांत यांचा सेल्फी व्हिडीओ सोशल मीडियावर आला आणि चाहत्यांनी अक्षरक्ष: धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली.
रजनीकांत आपली मोठी मुलगी ऐश्वर्यासोबत 28 जून रोजी चेन्नईतून निघाले आहेत. "रजनी सर आणि ऐश्वर्या अमेरिकेला गेले आहेत. नियमित वैद्यकीय तपासणीसाठी ते गेले आहेत. जुलै महिन्यातच ते परतणार आहेत" अशी माहिती आयएएनएस वृत्तसंस्थेने दिली आहे. रजनीकांत यांची तब्ब्येत ठणठणीत असून चिंतेचं कोणतंच कारण नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.
2011 रोजी रजनीकांत यांनी सिंगापूरमधील माऊंट एलिजाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. किडनी तसंच श्वसन संक्रमणासंबंधी असलेल्या समस्येमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सहा आठवड्यानंतर रजनीकांत यांनी डिस्चार्ज देण्यात आला होता. 2016 मध्ये आलेल्या कबाली चित्रपटानंतर त्यांनी एक आठवडा विश्रांती करण्याचा सल्ला देण्यात आला होता.
यानंतर रजनीकांत यांनी "2.0" चित्रपटासाठी शूटिंग सुरु केलं होतं. रोबोटचा सिक्वेल असलेल्या या चित्रपटात अक्षय कुमार व्हिलनच्या भुमिकेत दिसणार आहे. तर "काला करिकालन"मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील नटसम्राट नाना पाटेकर आणि थलायवा रजनीकांत यांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. रजनीकांत यांचा आगामी चित्रपट "काला करिकालन"मध्ये नाना पाटेकर महत्वाची भूमिका निभावणार आहे. नाना पाटेकर चित्रपटात व्हिलनची भूमिका निभावतान दिसतील तर रजनीकांत त्यांच्याशी टक्कर घेत दोन हात करताना दिसेल. नाना पाटेकर आणि रजनीकांत यांना एकत्र पडद्यावर पहायला मिळणार असल्याने चाहते मात्र प्रचंड खुशीत आहेत.