आई झाल्यानंतर पहिल्यांदाच अनुष्का शर्माने शेअर केला सेल्फी, फोटो पाहून चाहते झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 12:55 PM2021-02-08T12:55:22+5:302021-02-08T12:59:31+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने ११ जानेवारीला गोंडस मुलीला जन्म दिला.

For the first time since becoming a mother, Anushka Sharma shared a selfie | आई झाल्यानंतर पहिल्यांदाच अनुष्का शर्माने शेअर केला सेल्फी, फोटो पाहून चाहते झाले हैराण

आई झाल्यानंतर पहिल्यांदाच अनुष्का शर्माने शेअर केला सेल्फी, फोटो पाहून चाहते झाले हैराण

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने ११ जानेवारीला गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर काही दिवस ती सोशल मीडियापासून दूर होती. पण आता ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक्टिव्ह झाली आहे.मुलीच्या जन्मानंतर अनुष्काने पहिल्यांदाच सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पण तिचा हा फोटो पाहिल्यावर चाहते हैराण झाले आहेत.

अनुष्का शर्माने मुलीच्या जन्मानंतर विराट कोहली आणि फॅमिलीचे फोटो शेअर केले होते. मात्र तिने पहिल्यांदाच मिरर सेल्फी शेअर केला आहे. पण या फोटोमधील तिचा फिटनेस पाहून सर्वजण थक्क झाले आहे. या फोटोमध्ये अनुष्काच्या खांद्यावर बर्प क्लोथ आहे. जो लहान मुलांसाठी वापरला जातो. अनुष्काने फोटो शेअर करत म्हटले की, 'माझी सध्याची आवडती गोष्ट बर्प क्लोथ'. या फोटोत अनुष्काची डिलीव्हरी आताच झाली आहे, असे अजिबात वाटत नाही आहे. तिचा प्रेग्नन्सीनंतरचा हा फिटनेस पाहून चाहते हैराण झाले आहेत. 


अनेकांनी तर, 'तु काही महिन्यांपूर्वी प्रेग्नेन्ट होतीस होतीस असे अजिबात वाटत नाही.' असे प्रश्न विचारले आहेत. तर काहींनी विचारले, 'तू खरंच एका मुलीची आई आहेस का?'  प्रेग्नन्सी नंतर जवळपास सर्वच स्त्रियांचे वजन वाढतं, शरीराचा आकार बेढब होतो. मात्र अनुष्काच्या बाबतीत असे काहीच झाले नाही. प्रेग्नन्सीनंतरही ती पूर्वीसारखीच फिट आणि स्लिम दिसते आहे.


काही दिवसांपूर्वी अनुष्काने तिघांचा फोटो पोस्ट केला आणि तिने लेकीचे नाव वामिका असे ठेवल्याचे जाहीर केले. लेकीचा सोशल मीडियावरील पहिलाच फोटो शानदार बनवण्यासाठी अनुष्काने स्पेशल कॅप्शनही लिहिले. तिने लिहिले होते की,''आम्ही एकत्र प्रेम व कृतज्ञतेसह राहत होतो, परंतु या छोट्याशा वामिकाने आमच्या आनंदात आणखी भर टाकली. रडणे, हसणे, चिंता, आनंद या सर्व भावना आम्ही एका क्षणात अनुभवल्या. तुम्ही दाखवलेले प्रेम व प्रार्थना यासाठी आभारी आहे.'' 

Web Title: For the first time since becoming a mother, Anushka Sharma shared a selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.