करण जोहरचा 'गे' होण्यावर पहिल्यांदाच खुलासा

By Admin | Published: January 8, 2017 02:04 PM2017-01-08T14:04:34+5:302017-01-09T11:20:06+5:30

करण जोहरनं 'द अनस्युटेबल बॉय' या त्याच्या आत्मचरित्रात कधीही उल्लेख न केलेल्या मुद्द्यावर चर्चा केली आहे.

For the first time disclosure of Karan Johar's 'Gay' | करण जोहरचा 'गे' होण्यावर पहिल्यांदाच खुलासा

करण जोहरचा 'गे' होण्यावर पहिल्यांदाच खुलासा

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 8 - बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर गे असल्याची अनेकदा दबक्या आवाजात चर्चा होत असते. मात्र सर्व प्रकारावर करण जोहरनं त्यांच्या आत्मचरित्रातून मौन सोडलं आहे. करण जोहरनं 'द अनस्युटेबल बॉय' या त्याच्या आत्मचरित्रात कधीही उल्लेख न केलेल्या मुद्द्यावर चर्चा केली आहे. या आत्मचरित्रात त्याने स्वतःबद्दल दिलखुलास गोष्टी सांगितल्या आहेत. करण जोहरनं आत्मचरित्रात सेक्सवरही उत्तर दिलं आहे.

तो म्हणाला, सर्व लोक माझ्या सेक्सश्युल आयुष्याबद्दल जाणू इच्छितात. मला यासाठी ओरडून सांगण्याची गरज नाही. मी एका अशा देशात राहतो जेथे मी काही गोष्टी सांगितल्यास मला जेलची हवा खायला लागू शकते. वयाच्या 26व्या वर्षीच माझी व्हर्जिनिटी गेली, हे सांगण्यात मला काही अभिमान वाटत नाही. हे सर्व न्यू यॉर्कमध्ये झालं होतं. त्या वेळेपर्यंत मला सेक्सबद्दल काहीच अनुभव नव्हता.

(...जेव्हा करण जोहरने सलमानकडे भीक मागितली)

(यापुढे पाक कलाकारांसोबत काम करणार नाही - करण जोहर)

(करण जोहर 50 वर्षांचा वैफल्यग्रस्त व्हर्जिन - रणबीर कपूर)

 

दरम्यान, जेव्हा मी लहान होतो तेव्हाही मला सेक्सबद्दल एवढं माहीत नव्हतं. माझ्या वर्गातल्या एका मुलानं पहिल्यांदा मला ब्लो जॉबबद्दल विचारलं होतं. तेव्हा त्यानं मला विचारलं की तुला ब्लो जॉब माहीत आहे का ?, त्यावेळी मी नाही असं उत्तर दिलं. मला ब्लो जॉब काय असते हे माहीत नव्हतं, मात्र मी त्याबद्दल ऐकलं होतं. त्यानंतर त्या मुलानं मला स्वतःचे कपडे काढण्यास सांगून पंख्याचा स्पीड वाढवला, यालाच ब्लो जॉब म्हणतात, असे तो म्हणाला. त्यानंतर मी असं तीनदा केलं.

मोठा झाल्यावर सेक्समध्ये मला आवड नसल्याचं जाणवलं. त्यानंतर मला सेक्स का आवडत नाही, याबद्दल मी स्वतःलाच प्रश्न विचारत होतो. कुछ कुछ होता है हा माझा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर माझा सेक्सशी सामना झाला. मी सेक्ससंदर्भात स्वतः बद्दल ब-याच अफवा ऐकतो. शाहरुख खान आणि माझ्यात संबंध असल्याच्याही अफवा पसरवण्यात आल्या. मात्र शाहरुख खानला मी माझ्या मोठ्या भावाप्रमाणे मानतो. मी आणि शाहरुख कुठल्या परिस्थितीतून गेलो आहोत हे आम्हालाच माहीत आहे. शाहरुख खान माझ्यासाठी वडील भावासमान आहेत. आता तर मला सामान्य माणसासोबत दिसण्यासही भीती वाटते. मला असं वाटतं लोक विचार करतील की त्या माणसासोबतही मी सेक्स केला आहे. मी होमोसेक्सश्युल, बायोसेक्सश्युल असलो तरी तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मला या विषयावर बोलायचं नाही. माझा जन्म सेक्स आयुष्यावर चर्चा करण्यासाठी झाला नाही.

Web Title: For the first time disclosure of Karan Johar's 'Gay'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.