विमान ४५ मिनिटे लेट, एसीही बंद; इंडिगोने मागितली मित्तल यांची माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 07:14 AM2024-02-09T07:14:36+5:302024-02-09T07:15:33+5:30

संतापलेल्या मित्तल यांनी एक्स अकाउंटवर रागाला वाट मोकळी करून दिली.

Flight 45 minutes late, AC also off; Indigo apologized to anupam Mittal | विमान ४५ मिनिटे लेट, एसीही बंद; इंडिगोने मागितली मित्तल यांची माफी

विमान ४५ मिनिटे लेट, एसीही बंद; इंडिगोने मागितली मित्तल यांची माफी

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शार्क टँक या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीत आलेले उद्योजक अनुपम मित्तल हे सध्या इंडिगोविमान कंपनीवर चांगलेच भडकले आहेत. ते मुंबईहून दिल्लीला इंडिगोच्याविमानाद्वारे निघाले, मात्र त्यांच्या विमानाने ४५ मिनिटे विलंबाने उड्डाण केले. विशेष म्हणजे ४५ मिनिटांदरम्यान विमानातील वातानुकूलित यंत्रणाही बंद होती. यामुळे संतापलेल्या मित्तल यांनी एक्स अकाउंटवर रागाला वाट मोकळी करून दिली.

दिल्लीहून मुंबईसाठी येतानाही इंडिगोच्या विमानाचा खोळंबा झाला. दोन तास विलंबाने उड्डाण झाल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. मुंबई-दिल्ली, दिल्ली-मुंबई या प्रवासात आलेला वाईट अनुभव मित्तल यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट करून इंडिगो कंपनी, नागरी विमान महासंचालनालय (डीजीसीए) यांना टॅग केला आहे. मित्तल यांच्या संतापजनक प्रतिक्रियांनंतर  इंडिगो कंपनीने दिलगिरी व्यक्त केली. मुंबईत ट्रॅफिक असल्यामुळे विमान विलंबाने निघाल्याचे कारण सांगितले, तर दिल्लीमध्ये काही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तेथून विमानाचे उशिराने उड्डाण झाल्याचा खुलासा कंपनीने केला.

Web Title: Flight 45 minutes late, AC also off; Indigo apologized to anupam Mittal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.