सगळं काही मित्रासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2017 01:38 AM2017-06-23T01:38:41+5:302023-08-08T15:56:55+5:30

प्रसिद्ध डिझायनर विक्रम फडणीस दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरू करतोय, हे एव्हाना सर्वांनाच माहीत झाले आहे

For all the friends | सगळं काही मित्रासाठी

सगळं काही मित्रासाठी

googlenewsNext

सुवर्णा जैन
प्रसिद्ध डिझायनर विक्रम फडणीस दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरू करतोय, हे एव्हाना सर्वांनाच माहीत झाले आहे. त्याने दिग्दर्शित केलेला ‘हृदयांतर’ हा सिनेमा ७ जुलैला रसिकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमातील ‘पळ रे भोपळ्या टुणूक टुणूक’ हे गाणे सध्या बरेच गाजत आहे. जान्हवी प्रभू-अरोरा आणि राशी सलील हरमळकर यांनी गायलेले हे गाणे फराह खान यांनी कोरियोग्राफ केले आहे. याच निमित्ताने फराह खान यांच्याशी साधलेला हा खास संवाद ....


च्‘पळ रे भोपळ्या, टुणूक टुणूक’ या गाण्याची सध्या खूप चर्चा सुरू आहे. हे गाणे तुम्ही कोरियोग्राफ केले आहे. मराठी सिनेमातील गाणं कोरियोग्राफ करण्याचा योग कसा जुळून आला?
- मराठीमध्ये ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ असे काही आहे हे मलाच माहीत नव्हते. मात्र, विक्रमने मला सांगितले की, ही एक मजेशीर कविता आहे. या कवितेवर एक छान गाणे बनवतोय आणि ते तुलाच कोरियोग्राफ करायचे आहे. शेवटी मित्राला नाही बोलायचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे सगळे जुळून आले आणि एका दिवसात हे गाणे कोरियोग्राफ झाले.

च्हे गाणे कोरियोग्राफ करण्याचा
अनुभव कसा होता?
- मुक्ता बर्वे आणि दोन बालकलाकार मुलींसोबत काम करताना खूप मजा आली. या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जुळवून घेतले. सकाळी उठून मुली शाळेत जातात, असे रुटीन या गाण्यात दाखवण्यात आले आहे. हे गाणे करत असताना माझ्या मुलींची मला आठवण झाली. कारण माझी दिवसाची सुरुवात ही माझ्या मुलींपासूनच होत असते. त्यांच्यासाठी मी अशीच मागे मागे पळत असते.


च्तुमच्या तीन लेकींचा विषय निघालाय तर त्यांच्याविषयी जाणून
घ्यायला आवडेल? कशा रीतीने त्यांच्याशी तुमची धम्माल मस्ती सुरू असते?
- हल्लीची पिढी खूप स्मार्ट आहे. माझ्या मुलींविषयी काही सांगायलाच नको. सगळ्यात आधी तर त्या खूप नॉन फिल्मी आहे. असे असूनही मी त्यांना डान्स क्लासला पाठवते. त्या बेली डान्स शिकत आहेत. घरी आल्यावर मग काय त्यांची धम्माल सुरू असते. त्या घरी आल्यावर व्हिडीओ बनवतात आणि सोबतीने मलाही नाचवतात. मुलींसह खूप मस्ती सुरू असते.

च्तुम्ही हिंदी सिनेमा दिग्दर्शित केले आहेत. मराठी सिनेमा दिग्दर्शित किंवा निर्मिती करण्याची काही योजना आहे का?
- मराठी सिनेमा सध्या चांगली कामगिरी करत आहे. मराठी सिनेमांना मिळणारे यश खरंच कौतुकास्पद आहे. माझी मराठी सिनेमासाठी काम करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी ‘अगं बाई अरेच्चा’ या सिनेमासाठी काम केले होते. या सिनेमात ‘छम छम करता है’ हे गाणे सोनाली बेंद्रेवर चित्रित करण्यात आले होते. मात्र, मराठी सिनेमा दिग्दर्शित करण्याची किंवा मराठी सिनेमाच्या निर्मितीचा सध्या कोणताही प्लान नाही. मराठी भाषा समजते; मात्र त्यातील बारकावे समजत नाहीत. जोवर तुम्हाला एखाद्या गोष्टीमधील बारीकसारीक गोष्टी माहीत नसतात, तोवर तुम्ही त्यात परफेक्शन देऊ शकत नाही, असे मला वाटते.

च्यानंतरचे पुढचे प्रोजेक्ट किंवा प्लॅनिंगविषयी जाणून घ्यायला
आवडेल.
- सध्या काही दिवस मी भारतात नाही. कामाचा व्याप आणि बिझी शेड्युलमधून वेळ काढत मी सुट्टीवर जात आहे. न्यूयॉर्कमध्ये कुटुंबीयांसोबत ही सुट्टी एन्जॉय करणार आहे.

Web Title: For all the friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.