माजी पॉर्न स्टार Mia Khalifa ने आर्मपिटमध्ये घेतलं बोटॉक्स इंजेक्शन, बिनधास्तपणे सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 01:43 PM2021-11-05T13:43:27+5:302021-11-05T13:44:27+5:30
Mia Khalifa : मियाने सांगितलं की, तिने तिच्या आर्मपिट्ससाठी बोटॉक्स इंजेक्शन घेतलं आहे. मियाने इन्स्टा स्टोरीवर या प्रोसीजरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
माजी पॉर्न स्टार मिया खलीफा (Mia Khalifa) आपल्या वादग्रस्त आणि बिनधास्त विधानांसाठीही ओळखली जाते. मियाने आपले वर्ड्स फिल्टर करत नाही आणि आपली मतं परखडपणे मांडते. याचं एक उदाहरण पुन्हा एकदा तिने दिलं आहे. मियाने आर्मपिटसाठी केलेल्या बोटॉक्स ट्रिटमेंटचा खुलासा केला आहे.
मियाने सांगितलं की, तिने तिच्या आर्मपिट्ससाठी बोटॉक्स इंजेक्शन घेतलं आहे. मियाने इन्स्टा स्टोरीवर या प्रोसीजरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. मियाने बोटॉक्स इंजेक्शन घेण्याचाही खुलासा केला आहे.
मियाने आर्मपिटसाठी बोटॉक्स ट्रीटमेंट घेण्याचं कारण शेअर करत सांगितलं की, तिला फार जास्त घाम येतो. ती गेल्या पाच वर्षापासून hyperhidrosis (जास्त घाम येणे) या समस्येने ग्रस्त होती. तिला जाणवलं की, चिंता जास्त वाढली की, परफ्यूम आणि डिओड्रंट लावल्यानेही काही फरक पडत नाही. जास्त घाम येण्याची समस्या सोडवण्यासाठी तिला बोटोक्स ट्रीटमेंट घ्यावी लागली.
मियानुसार, या प्रक्रियेच्या मदतीने तिला जास्त घाम येणं पूर्णपणे कमी होईल. मिया आपल्या आर्मपिटसाठी वर्षातून २-३ वेळा ट्रीटमेंट घेत आहे. मियाने जो व्हिडीओ शेअर केलाय, त्यात ती म्हणाली की, माझ्याकडे माझं लाइफ आहे. माझं शर्ट घामाने भीजत नाही. मी ग्रे घालू शकते. मला हिवाळ्यात डागांमुळे हैराण होण्याची गरज नाही. आर्मपिटसाठी बोटॉक्स ट्रीटमेंट घेतल्यावर माझं जीवन बदललं.
मिया खलीफा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव असते. मिया आधी पॉर्न इंडस्ट्रीत काम करत होती. आता तिने ही इंडस्ट्री सोडली आहे. मिया आता सोशल मीडियावरून आपल्या बोल्ड फोटोंनी फॅन्सचं लक्ष वेधून घेते. मियाचे टॉपलेस आणि न्यूड फोटो व्हायरल होत असतात.