Gadar 2च्या स्क्रिनिंगच्या निमित्ताने पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली सनी देओलची आई, धर्मेंद्र यांनी मारली दमदार एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 05:01 PM2023-08-12T17:01:37+5:302023-08-12T17:05:18+5:30
एरव्ही लाईमलाईटपासून दूर राहण्याऱ्या प्रकाश कौर मुलाचा सिनेमा पाहण्यासाठी आल्या होत्या.
बॉलिवूड मेगास्टार सनी देओलचा गदर २ चित्रपट प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी चित्रपटाने ४० कोटींचा गल्ला जमवला आहे. गदर चित्रपटाची पार्श्वभूमी असल्याने सनी देओल आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील जंग पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात हाऊसफुल्ल गर्दी केली आहे. या चित्रपटात सनी देओलसह अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा प्रमुख भूमिकेत आहे. सिनेमा रिलीज झाल्यानंतर बॉलिवूड कलाकरांसाठी एक स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगमध्ये सनी देओलची आई प्रकाश कौर आणि वडील धर्मेंद्रही दिसले. या दोघांचे फोटो येताच सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना एकत्र पाहून चाहते खूप खूश झाले.
गदर २ सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग नुकतेच पार पडले. मुलाचा सिनेमा पाहण्यासाठी सनी देओल यांची आई प्रकाश कौर यासुद्धा आल्या होत्या. एरव्ही लाईमलाईटपासून दूर राहण्याऱ्या प्रकाश कौर यांचं स्क्रिनिंग दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. प्रकाश कौर यांच्यासोबत धर्मेंद्रही पोहोचले. लेकाचा सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या धर्मेंद्र यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय.
रिपोर्ट्सनुसार, प्रकाश कौर यांना चित्रपट पाहणं फारसं आवडत नाही. त्या खूप कमी सिनेमे पाहतात. . त्याचवेळी या खास प्रसंगी धर्मेंद्रही पत्नीसोबत मुलाचा चित्रपट पाहण्यासाठी आले होते. यावेळी धर्मेंद्र यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक पाहायला मिळाली.
राष्ट्रपती भवनमध्ये होणार स्पेशल स्क्रिनींग
सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर २ ने पहिल्या वीकेंडला चांगली कमाई करत असून १५ ऑगस्टच्या निमित्ताने देशभरातही देशभक्तीचा फिव्हर आहे, तसेच, जोडून सुट्ट्या आल्याने चित्रपटगृह हाऊसफुल्ल होत आहेत. विशेष म्हणजे देशाच्या राष्ट्रपतींनीही चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी आज तकशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. आम्ही काल बसलो होतो, तेव्हा सेन्सॉर बोर्डातून आम्हाला फोन आला. त्यावेळी, तिकडून सांगण्यात आलं की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गदर २ चित्रपट पाहू इच्छित आहेत. त्यानंतर, त्यांनी आम्हाला ई-मेलही केला. त्यामुळे, आम्ही सर्वजण खूपच खुश आहोत, आनंदाने नाचू लागलो. कारण, गदर २ चित्रपटाला एवढा मोठा सन्मान मिळत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे, असे अनिल शर्मा यांनी म्हटलं.