गदर 2: सिनेमा सुरु असताना दोन गटात तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 11:42 AM2023-08-15T11:42:13+5:302023-08-15T11:43:13+5:30
Gadar 2:चित्रपटगृहामध्ये गदर २ चा शो सुरु असताना दोन गटांमध्ये तुंबळ मारामारी झाली.
सनी देओल (sunny deol) याचा बहुचर्चित ठरलेला ‘गदर: 2’ (Gadar 2) हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. हा सिनेमा रिलीज झाल्यापासून अगदी डे वनपासून त्याचे सगळे शो हाऊसफूल जात आहेत. त्यामुळे हा सिनेमा यशस्वी कामगिरी करताना दिसत आहे. परंतु, या सिनेमाच्या यशाला गालबोट लागलं आहे. एका चित्रपटगृहामध्ये गदर २ चा शो सुरु असताना दोन गटांमध्ये तुंबळ मारामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळे प्रेक्षक गर्दी करुन सिनेमा पाहायला जात आहेत. यामध्येच दोन गटांमध्ये घोषणाबाजीमुळे मोठी मारामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या ट्विटरवर ट्रेंड होत आहे.
गदर 2 पाहताना थिएटरमध्ये कोणीतरी "हिंदुस्तान झिंदाबाद" ऐवजी "मोदी झिंदाबाद" असे ओरडले आणि हे घडले.
— Adv Anand Dasa (@Anand_Dasa88) August 14, 2023
खर आहे का?pic.twitter.com/TPv8TZ1wXy
अलिकडेच ट्विटर (X) वर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये गदर २ च्या शो दरम्यान दोन गटांमध्ये तुफान हाणामारी होत असल्याचे दिसून आले आहे. या व्हिडीओमध्ये काही जण मोदी जिंदाबाद म्हणत आहेत. तर, काही जण पाकिस्तान जिंदाबाद असं म्हणत आहेत. या घोषणाबाजीमुळे ही मारामारी झाल्याचं म्हटलं जात आहे. याविषयी ट्विटरवर मोहम्मद झुबेर या फॅक्ट चेकर अकाऊंटवरुन या व्हिडीओ संदर्भातील माहिती देण्यात आली आहे.
कुठे घडला हा प्रकार?
बरेलीतील प्रसाद टॉकीजमध्ये हा प्रकार घडला असून चित्रपटगृहाच्या मालकांनीदेखील ही मारामारी झाल्याचं मान्य केलं. परंतु, या गटामधील मारामारीचं कारण घोषणाबाजी नसून दोन्ही गटातील लोक मद्यधुंद अवस्थेत होते. त्यामुळे या गटात मारामारी झाली.