अल्लु अर्जुनच्या चिमुकल्या लेकीने साकारली लाडक्या बाप्पाची मूर्ती, नेटकरी करतायेत कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 12:18 PM2023-09-18T12:18:09+5:302023-09-18T16:40:47+5:30

अल्लूची ६ वर्षांची मुलगी अरहा एक प्रसिद्ध स्टार किड आहे, शाडूच्या मातीपासून बाप्पाची मूर्ती घडवतानाचा तिचा व्हिडीओ व्हायरल होतेय.

Ganesh chaturthi 2023 allu arjun 6 year old daughter arha makes eco friendly ganpati | अल्लु अर्जुनच्या चिमुकल्या लेकीने साकारली लाडक्या बाप्पाची मूर्ती, नेटकरी करतायेत कौतुकाचा वर्षाव

अल्लु अर्जुनच्या चिमुकल्या लेकीने साकारली लाडक्या बाप्पाची मूर्ती, नेटकरी करतायेत कौतुकाचा वर्षाव

googlenewsNext

संपूर्ण देशभरात  गणेशोत्सवाची  धामधूम पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सगळे सज्ज झालेत. सेलिब्रेटीही याला अपवाद नाहीत. सुपरस्टार अल्लु अर्जुनच्या लेकीनेहीत घरात गणपती बाप्पाची मनमोहक  मूर्ती साकारली आहे, अर्जुनची पत्नी स्नेही रेड्डीने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांची सहा वर्षांची लेक अल्लू अरहा बाप्पाची मूर्ती घडवताना दिसतेय. 

छोटी अरहा  शाडूच्या मातीपासून चिमुकल्या हाताने बाप्पांची मूर्ती साकारताना दिसत आहे. अरहाने  बालगणेशाची मूर्ती बनवली आहे. अरहाचा हो व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. यूजर्स चिमुकल्या अरहाचे कौतुक करताना थकत नाहीत. अरहाने यापूर्वीही अनेकवेळा गणपती बाप्पाची मूर्ती घडवली आहे. अल्लु अनेकवेळा आपल्या लाडक्या लेकीचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.  

अल्लूची ६ वर्षांची मुलगी अरहा एक प्रसिद्ध स्टार किड आहे आणि तिचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर अरहाने समंथा रुथ प्रभूच्या 'शकुंतलम' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. आता 'देवरा'च्या माध्यमातून ती तिच्या अभिनयात करिअर करणार आहे. ६ वर्षीय अरहाचा 'देवरा'शी असलेला संबंध चर्चेचा विषय आहे. यासोबतच त्याची चित्रपटाची फी देखील चर्चेत आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटात तिची १० मिनिटांची भूमिका असेल आणि त्यासाठी तिला २० लाख रुपये फी म्हणून दिली जाणार आहे.
 

Web Title: Ganesh chaturthi 2023 allu arjun 6 year old daughter arha makes eco friendly ganpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.