Ganesh Chaturthi 2023: शिल्पा शेट्टीपासून रामचरणपर्यंत...या कलाकारांनी जल्लोषात स्वागत केलं गणपती बाप्पाचं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 10:01 AM2023-09-19T10:01:24+5:302023-09-19T10:01:55+5:30

Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या आगमनाचा उत्साह आणि जल्लोष आज सर्वत्र दिसून येत आहे. घराघरात बाप्पा विराजमान झाले आहेत. काही सेलिब्रेटींच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन मोठ्या जल्लोषात झालं आहे.

Ganesh Chaturthi 2023: From Shilpa Shetty to Ram Charan...these actors welcome Ganesh Bappa with gaiety | Ganesh Chaturthi 2023: शिल्पा शेट्टीपासून रामचरणपर्यंत...या कलाकारांनी जल्लोषात स्वागत केलं गणपती बाप्पाचं

Ganesh Chaturthi 2023: शिल्पा शेट्टीपासून रामचरणपर्यंत...या कलाकारांनी जल्लोषात स्वागत केलं गणपती बाप्पाचं

googlenewsNext

बाप्पाच्या आगमनाचा उत्साह आणि जल्लोष आज सर्वत्र दिसून येत आहे. घराघरात बाप्पा विराजमान झाले आहेत. काही सेलिब्रेटींच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन मोठ्या जल्लोषात झालं आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री हिरव्या रंगाचा अनारकली सूट घालून बाप्पाला घरी आणताना दिसत आहे. घरात जाण्यापूर्वी अभिनेत्रींनी नारळ फोडला आणि त्यानंतर बाप्पाने घरात प्रवेश केला. यावेळी अभिनेत्रीसोबत तिचा पती राज कुंद्राही दिसला. मात्र, नेहमीप्रमाणे यावेळीही राजने तोंडाला मास्क लावलेले दिसले.

याशिवाय साऊथचे सुपरस्टार राम चरणनेही आपल्या घरी गणपती बाप्पाची स्थापना केली आहे. त्याचे फोटो त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो संपूर्ण कुटुंबासह बाप्पाची पूजा करताना दिसत होता. फोटोत अभिनेत्याचे वडील चिरंजीवी देखील दिसत आहेत.

साऊथ स्टार आणि 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुननेही आपल्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर याचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या मंदिराची झलक दाखवली आहे. ज्यामध्ये बाप्पाची अतिशय सुंदर मूर्ती बसवली आहे.

याशिवाय अभिनेते सुधीर बाबू यांनीही बाप्पाचे घरी स्वागत केले आहे. अभिनेत्याने त्याच्या मकराची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ज्यामध्ये बाप्पाच्या मूर्तीची अतिशय सुंदर सजावट करण्यात आली आहे.

 

Web Title: Ganesh Chaturthi 2023: From Shilpa Shetty to Ram Charan...these actors welcome Ganesh Bappa with gaiety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.