VIDEO: एकदंताय वक्रतुण्डाय... प्रियाच्या सुरेल आवाजातलं गाणे ऐकून नक्कीच व्हाल मंत्रमुग्ध!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 01:23 PM2024-09-10T13:23:46+5:302024-09-10T13:26:56+5:30

बाप्पा घरी आल्याने सगळीकडे चैतन्य पसरलंय.

Ganesh Utsav 2024 Umesh Kamat Shared Singing Video Of Priya Bapat Shree Ganeshay Dheemahi Song by Shankar Mahadevan | VIDEO: एकदंताय वक्रतुण्डाय... प्रियाच्या सुरेल आवाजातलं गाणे ऐकून नक्कीच व्हाल मंत्रमुग्ध!

VIDEO: एकदंताय वक्रतुण्डाय... प्रियाच्या सुरेल आवाजातलं गाणे ऐकून नक्कीच व्हाल मंत्रमुग्ध!

अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. त्या दोघांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. प्रिया आणि उमेश सोशल मीडियावर सक्रीय असून ते या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतात.  अशातच उमेशने एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

प्रिया आणि उमेश यांच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. बाप्पा घरी आल्याने सगळीकडे चैतन्य पसरलंय.  सर्व वातावरण भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळतंय. यात प्रियाच्या सुरेल आवाजातलं गाणे ऐकून तर तुम्ही नक्कीच मंत्रमुग्ध व्हाल. उमेशने प्रियाचा गणपतीचं गाणं गायनाचा व्हिडिओ शेअर केला आहे.  यामध्ये प्रिया ही  शंकर महादेवन यांचं 'एकदंताय वक्रतुण्डाय' हे गाणं गाताना पाहायला मिळत आहे. प्रियाने हे गाणं उमेशच्या फर्माईशवर गायलं. 

उमेशने कॅप्शनमध्ये लिहलं,  'दरवर्षी गणपतीत "शास्त्र असतं ते"...माझी फर्माईश प्रियाचं गाणं'. या व्हिडीओवर अभिनेते अविनाश नारकर यांनी कमेंट करत प्रियाचं कौतुक केलं आहे. त्यांनी लिहलं, ''व्वा व्वा व्वा व्वा व्वा व्वा... प्रिया....!! गणपती बाप्पा मोरया...!!'. तर भिनेत्री शर्वरी जोगनेही  'कमाल' अशी कमेंट केली आहे. यासोबतच चाहत्यांनीदेखील प्रियाचं भरभरुन कौतुक केलं आहे. 


उमेश-प्रिया ही जोडी कमालच आहे. त्यांचे फोटोस व्हिडिओ, डान्स, गाणं, नाटक, सिनेमा काहीही असो हिटच होतं. आता देखील 'जर तरची गोष्ट' मधून त्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. दोघांच्या लग्न, प्रेमाचे किस्सेही सर्वांनाच माहित आहेत. सहा वर्षे डेटींगनंतर त्यांनी लग्न केलं होतं. उमेश आणि प्रिया यांच्या वयात 8 वर्षाचे अंतर आहे. दोघेही चाहत्यांना कायम कपल गोल्स देताना दिसून येतात. 


Web Title: Ganesh Utsav 2024 Umesh Kamat Shared Singing Video Of Priya Bapat Shree Ganeshay Dheemahi Song by Shankar Mahadevan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.