Ganeshotsav 2024: मराठी कलाकारांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन, शेअर केली झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 09:22 AM2024-09-07T09:22:44+5:302024-09-07T09:24:30+5:30

Ganeshotsav 2024: सध्या सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनामुळे आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. आपल्या लाडक्या मराठी कलाकारांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाला आहे.

Ganeshotsav 2024: Ganpati Bappa arrives at the home of Marathi celebrity, glimpse of celebrity Bappa | Ganeshotsav 2024: मराठी कलाकारांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन, शेअर केली झलक

Ganeshotsav 2024: मराठी कलाकारांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन, शेअर केली झलक

सध्या सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनामुळे आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. आपल्या लाडक्या मराठी कलाकारांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाला आहे. कलाकारांनी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आपल्या बाप्पाची झलक दाखवली आहे. 

अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी दरवर्षी प्रमाणे यंदाही गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. त्याच्या बाप्पाची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.


अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या घरीदेखील बाप्पाचं स्वागत करण्यात आलं आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


तिने लिहिले की, आमचे बाप्पा विराजमान झाले. गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… “गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा”.

अभिनेत्री सायली संजीवनेदेखील तिच्या घराच्या बाप्पाची झलक दाखवली आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, मोरया मोरया मी बाळ तान्हें | तुझीच सेवा करु काय जाणे || अन्याय माझे कोट्यानुकोटी |
मोरेश्वरा बा तू घाल पोटी ||


तू चाल पुढं मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता आदित्य वैद्यच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन झालं आहे. त्याने व्हिडीओ शेअर केला आहे. 


Web Title: Ganeshotsav 2024: Ganpati Bappa arrives at the home of Marathi celebrity, glimpse of celebrity Bappa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.