'मन्नत'मध्ये बाप्पा विराजमान; फोटो शेअर करत शाहरुख खान म्हणाला, "आरोग्य, प्रेम आणि आनंद..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 01:06 PM2024-09-08T13:06:03+5:302024-09-08T13:07:32+5:30

 दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्यात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.

Ganeshotsav 2024 Shah Rukh Khan Welcomes Ganapati Bappa at Mannat | 'मन्नत'मध्ये बाप्पा विराजमान; फोटो शेअर करत शाहरुख खान म्हणाला, "आरोग्य, प्रेम आणि आनंद..."

'मन्नत'मध्ये बाप्पा विराजमान; फोटो शेअर करत शाहरुख खान म्हणाला, "आरोग्य, प्रेम आणि आनंद..."

 Ganapati Bappa at Mannat :आज देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी लाडक्या बाप्पाचं (Ganeshotsav 2024)आगमन झाल्याचं पाहायला मिळत आहे.  दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्यात  (Ganapati Bappa at Mannat) गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.  शाहरुखच्या घरी बाप्पाची विधीवत पूजा करण्यात आली. शाहरुख खानने सोशल मीडियावर आपल्या घरातील गणपती बाप्पाचा खूप गोड फोटो शेअर केला आहे. 

शाहरुख खानने इन्स्टाग्रामवर बाप्पाच्या आगमनाचा फोटो शेअर केला. कॅप्शनमध्ये त्याने लिहलं, 'गणेश चतुर्थीच्या या शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पा आपल्या सर्वांना आणि आपल्या कुटुंबियांना आरोग्य, प्रेम आणि आनंद देवो... आणि हो अर्थातच  भरपूर मोदकही देवो'. शाहरुखच्या या पोस्टवर चाहत्यांनी असंख्य कमेंट करत त्यांचे कौतुक केले आहे. त्याने शेअर केलेले हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


शाहरुख खानचा धर्म वेगळा असला तरीही गणेश उत्सव ते दिवाळी हे सर्व सण मोठ्या थाटामाटात साजरे करतो. धर्मनिरपेक्ष अभिनेता म्हणून शाहरुखला ओळखलं जातं. दरवर्षी 'मन्नत' बंगल्यात गणपती बाप्पा विराजमान होतात. शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो 'किंग' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीलाय येणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात तो मुलगी सुहाना खान आणि अभिषेक बच्चनसोबत दिसणार आहे, ज्याचे शूटिंग सध्या सुरू आहे. 
 

Web Title: Ganeshotsav 2024 Shah Rukh Khan Welcomes Ganapati Bappa at Mannat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.