आलियाच्या 'Gangubai Kathiawadi' ने कंगनाच्या अनेक सिनेमांना चारली धुळ, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 12:51 PM2022-03-01T12:51:38+5:302022-03-01T12:58:47+5:30

Alia Bhatt - Kangana Ranaut : कोरोना महामारीतही या सिनेमाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाने चांगली कमाई केली आहे.

'Gangubai Kathiawadi' Crosses Collection Of These 5 Kangana Films In Just 3 Days | आलियाच्या 'Gangubai Kathiawadi' ने कंगनाच्या अनेक सिनेमांना चारली धुळ, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

आलियाच्या 'Gangubai Kathiawadi' ने कंगनाच्या अनेक सिनेमांना चारली धुळ, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

googlenewsNext

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या आलिया भट्टची (Alia Bhatt) मुख्य भूमिका असलेल्या 'गंगुबाई काठियावाडी'ला (Gangubai Kathiawadi) थिएटरमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांनी सिनेमाचं कौतुक केलं आहे. कोरोना महामारीतही या सिनेमाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाने चांगली कमाई केली आहे.

शुक्रवारी रिलीजनंतर या सिनेमा पहिल्या दिवशी १०.५० कोटी रूपयांची कमाई केली आणि शनिवारी १३.३२ कोटी रूपयांची कमाई केली. इतकंच नाही तर रविवारी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच उडी घेतली. Box Office Worldwide report नुसार, सिनेमाने तिसऱ्या दिवशी १६.५० कोटी रूपयांची कमाई केली. एकंदर या सिनेमाने पहिल्या आठवड्यात ४०.३२ कोटी रूपयांची कमाई केली. महाशिवरात्रीमुळे सुट्टी असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

आलियाचा हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी कंगना राणौतने (Kangana Ranaut) आलियावर आणि सिनेमाच्या मेकर्सवर निशाणा साधला होता. इन्स्टाग्रामवरून कंगना म्हणाली होती की, आलिया कास्टिंग चुकीचं झालं आहे. ती आलियाला पापाची परी असंही म्हणाली होती. कंगना असंही म्हणाली होती की, सिनेमावर लावण्यात आलेले २०० कोटी रूपयेही पाण्यात जातील. कारण हा सिनेमा चालणार नाही. 

पण वास्तविक पाहता आलियाच्या 'गंगुबाई काठियावाडी' सिनेमाने अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे. पहिल्याच आठवड्यात आलियाच्या या सिनेमाने कंगनाच्या आधीच्या काही सिनेमांना धुळ चारली आहे. कंगनाने जयललिता यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत होती. पण या सिनेमावर बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवता आली नाही. अनेक डिस्ट्रीब्यूशेनने तर हा सिनेमा नॉर्थ इंडियात रिलीज करण्यासही नकार दिला होता.  या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने एकूण १.४६ कोटी रूपयांची कमाई केली होती.

कंगना त्याआधी अश्विनी अय्यर तिवारीच्या 'पंगा' सिनेमात दिसली होती. जानेवारी २०२० मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाला समीक्षकांचीही पसंती मिळाली होती. पण सिनेमाला हवं ते यश मिळालं नाही. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टननुसार, पंगा सिनेमाने एकूण फक्त २८.९२ कोटी रूपयांची कमाई केली. 

तसेच २०१७ मध्ये कंगनाचा 'सीमरन' सिनेमा आला होता. सीमरन सिनेमाला संमीश्र प्रतिसाद मिळाला.  या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर केवळ १७.२६ कोटी रूपयांची कमाई केली होती. तसेच कंगनाच्या 'कट्टीबट्टी'ने २४.४१ कोटी रूपयांची कमाई केली. तर रिवॉल्व्हर राणीने १०.३४ कोटी रूपयांची कमाई केली होती. त्या तुलनेत आलियाच्या गंगुबाई काठियावाडीने एका आठवड्यात भक्कम कमाई केली. त्यामुळे कंगनाने केलेलं वक्तव्या खोटं ठरतं. म्हणजे तिने आधी तिचे सिनेमे बघावे मग इतरांवर टिका करावी.
 

Web Title: 'Gangubai Kathiawadi' Crosses Collection Of These 5 Kangana Films In Just 3 Days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.