CoronaVirus: कोरोनाशी लढण्यासाठी गरम मसाला उपयोगी?, यासाठी पहा कार्तिक आर्यनचा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 03:38 PM2020-04-27T15:38:58+5:302020-04-27T15:45:21+5:30

कार्तिक आर्यनचा युट्यूबवरील लोकप्रिय चॅट शो कोकी पुछेगाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे.

Garam masala is useful to fight corona, watch this video of Karthik Aryan TJL | CoronaVirus: कोरोनाशी लढण्यासाठी गरम मसाला उपयोगी?, यासाठी पहा कार्तिक आर्यनचा हा व्हिडिओ

CoronaVirus: कोरोनाशी लढण्यासाठी गरम मसाला उपयोगी?, यासाठी पहा कार्तिक आर्यनचा हा व्हिडिओ

googlenewsNext

कार्तिक आर्यनने लॉकडाउनमध्ये युट्युबवर कोकी पुछेगा हा चॅट शो सुरू केला. या शोमध्ये कोरोनाशी संदर्भात जनजागृती करणारा संदेश व माहिती दिली जाते. या शोला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. कोकी पुछेगाच्या पहिल्या एपिसोडमध्ये कार्तिकने कोविड 19 सर्व्हायव्हर सुमिती सिंगसोबत चर्चा केली होती. दुसऱ्या भागात गुजरातमधील एक डॉक्टर मीमांसा बुच यांची मुलाखत घेतली होती. तिसऱ्या एपिसोडमध्ये मध्य प्रदेशचे पोलीस मधुरवीना यांच्यासोबत बातचीत केली होती. आता प्रसिद्ध फिटनेस व लाइफस्टाईल कोच ल्यूक कॉउटिन्होसोबत चर्चा करताना दिसणार आहे.

 ल्यूक यांच्या व्हिडिओ लाखो लोकांसाठी आणि फिटनेस फ्रीक असणाऱ्यांना प्रेरणा देते. लॉकडाउनदरम्यान सर्व घरात कैद आहेत. अशावेळेत घरात राहून फिटनेस कसा राखता येईल, हे ल्यूककडून जाणून घेणार आहे.

कार्तिकने नुकताच कोकी पुछेगाच्या आगामी एपिसोडचा टीझर शेअर केला आहे ज्यात तो ल्यूकला प्रश्न विचारताना दिसतो आहे. या टीझरमध्ये कार्तिकने ल्यूकला विचारले की, भारतीय किचनमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कोणती गोष्ट आहे, त्यावर ल्यूकने उत्तर दिलं की गरम मसाला. त्यावर दोघेही हसले आणि कार्तिक हसत म्हणाला की, गरम मसाला माझा आवडता सिनेमा आहे. त्यावर ल्यूक म्हणाले की, आता खाण्यातही त्याचा थोडा वापर कर.

कार्तिक घरात राहूनही खूप व्यस्त आहे. तो लोकांमध्ये जनजागृती पसरविण्याचे काम करतो आहे. तसेच कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी त्याने 1 कोटी रुपयांचा निधी पी एम केअर फंडात दिला आहे.

Web Title: Garam masala is useful to fight corona, watch this video of Karthik Aryan TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.