गश्मीर महाजनीचा हा सिनेमा येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 12:21 PM2018-09-06T12:21:07+5:302018-09-07T06:30:00+5:30

'एक राधा एक मीरा' या चित्रपटाचा पोस्टर नुकताच गश्मीरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. 

Gashmeer Mahajani new movie Ek Radha Ek Meera | गश्मीर महाजनीचा हा सिनेमा येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

गश्मीर महाजनीचा हा सिनेमा येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext
ठळक मुद्दे'एक राधा एक मीरा' 23 नोव्हेंबरला होणार प्रदर्शित मृण्मयीचा ग्लॅमरस अंदाजगश्मीरसह मृण्मयी देशपांडे व सुरभी भोसले मुख्य भूमिकेत

 

'कॅरी ऑन मराठा', 'देऊळबंद', 'कान्हा', 'वन वे तिकिट', 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या मराठी सिनेमातून झळकलेला अभिनेता गश्मीर महाजनीने आपल्या अभिनयाने रसिकांना भुरळ पाडली आहे. तसेच त्याने 'मुस्कुराके देख जरा' व 'डोंगरी का राजा' या हिंदी चित्रपटातदेखील काम केले आहे. आता त्याचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'एक राधा एक मीरा'. या चित्रपटाचा पोस्टर नुकताच गश्मीरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. 



'एक राधा एक मीरा' चित्रपटात प्रेमाच्या अलीकडची व मैत्रीच्या पलीकडची गोष्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्रिकोणी प्रेमकथा पाहायला मिळेल, असे वाटते आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण परदेशात झाले आहे. या चित्रपटात गश्मीरसह अभिनेत्री मृण्मयी देशपांडे व सुरभी भोसले मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन व निर्मिती महेश मांजरेकर यांनी केले आहे. तसेच ते या चित्रपटात अभिनय करतानाही दिसणार आहेत. त्यांच्यासोबत या चित्रपटात मेधा मांजरेकरदेखील पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात मृण्मयीचा ग्लॅमरस अंदाज अनुभवायला मिळणार आहे. 



'एक राधा एक मीरा' हा चित्रपटाचे नाव आधी 'रुबिक्स क्यूब' ठेवण्यात आले होते. याच नावाने या चित्रपटाचा म्युझिक लाँच सलमान खानच्या हस्ते करण्यात आला होता. मात्र चित्रपटाचे नाव का बदलले, याबाबत अद्याप काही समजू शकलेले नाही. 'एक राधा एक मीरा' हा चित्रपट 23 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून गश्मीर व मृण्मयीची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

Web Title: Gashmeer Mahajani new movie Ek Radha Ek Meera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.