'विराट तू एक...';गौरव मोरेने मोजक्याच शब्दात साजरा केला RCB चा विजयोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 10:38 AM2024-05-19T10:38:57+5:302024-05-19T10:39:13+5:30

RCB च्या विजयानंतर गौरव मोरेने मोजक्या शब्दात विराट कोहलीचं कौतुक करत खास पोस्ट लिहिली आहे (rcb, virat kohli, gaurav more)

Gaurav More post after virat kohli RCB win against csk and enter in ipl playoffs 2024 | 'विराट तू एक...';गौरव मोरेने मोजक्याच शब्दात साजरा केला RCB चा विजयोत्सव

'विराट तू एक...';गौरव मोरेने मोजक्याच शब्दात साजरा केला RCB चा विजयोत्सव

काल विराट कोहलीची RCB टीम विजयी झाली. चेन्नई सुपर किंग्जला हरवून RCB ने प्लेऑफमध्ये त्यांचं स्थान पक्क केलं. RCB ने रोमहर्षक लढतीत सामना जिंकला. विराट कोहली कालच्या सामन्यात सुरुवातीपासून अग्रेसिव्ह मोडमध्ये खेळत होता. RCB जिंकल्यावर विराटने सळसळत्या एनर्जीत विजय साजरा केला. अशातच कॉमेडियन आणि अभिनेता गौरव मोरेने RCB जिंकल्यावर विराट कोहलीसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

RCB च्या विजयानंतर गौरव मोरने विराटला टॅग करत 'बाजीगर' हा शब्द वापरला आहे. खऱ्या अर्थाने IPL 2024 मध्ये RCB ने शेवटच्या क्षणी  झुंज देत प्लेऑफमध्ये त्यांचं स्थान पक्क केलं. 'हारकर जितने वाले को बाजीगर कहते है', हे वाक्य RCB ने खरं ठरवलं. त्यामुळेच गौरव मोरेने RCB साठी बाजीगर हा शब्द वापरला आहे. पुढे विराट कोहलीचे फोटो शेअर करत गौरवने त्याचं कौतुक केलंय. 

दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात RCB ने उत्तम सांघिक खेळ करून सलग सहाव्या विजयाची नोंद केली. RCB  व CSK या दोन्ही संघांचे १४ गुण आहेत, परंतु बंगळुरूने आज शानदार विजय मिळवून नेट रन रेटच्या जोरावर प्ले ऑफचे तिकीट पक्के केले. रचीन रवींद्रचा रन आऊट हा सामन्याला कलाटणी देणारा ठरला, त्यात RCB चा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने अफलातून झेल  घेऊन सामन्याला निकाल निश्चित केला. रवींद्र जडेजा व महेंद्रसिंग धोनी यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला होता, परंतु १० धावा प्ले ऑफसाठी कमी पडल्या.

 

Web Title: Gaurav More post after virat kohli RCB win against csk and enter in ipl playoffs 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.