सईच्या "आलेच मी..." लावणीवर थिरकली गौतमी पाटील, अभिनेत्री कमेंट करत म्हणाली...

By कोमल खांबे | Updated: April 18, 2025 09:36 IST2025-04-18T09:32:22+5:302025-04-18T09:36:04+5:30

विषय कट! "आलेच मी..." लावणीवर थिरकली गौतमी पाटील, व्हिडिओ पाहून सई ताम्हणकर म्हणते...

gautami patil dance video on aalech me lavani song sai tamhankar commented | सईच्या "आलेच मी..." लावणीवर थिरकली गौतमी पाटील, अभिनेत्री कमेंट करत म्हणाली...

सईच्या "आलेच मी..." लावणीवर थिरकली गौतमी पाटील, अभिनेत्री कमेंट करत म्हणाली...

मराठी सिनेसृष्टीसोबत बॉलिवूड गाजवणारी सई ताम्हणकर एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. सई 'देवमाणूस' या सिनेमात पहिल्यांदाच लावणीवर थिरकताना दिसणार आहे. सईचं "आलेच मी..." हे लावणी साँग नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांचीही पसंती मिळत आहे. सईच्या या लावणीवरील अनेक सेलिब्रिटी आणि चाहतेही रील व्हिडिओ करताना दिसत आहेत. आता नृत्यांगणा गौतमी पाटीलने सईच्या या लावणीवर डान्स केला आहे. 

सबसे कातील गौतमी पाटील नेहमीच तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. ट्रेंडिंग गाण्यावर गौतमी रील व्हिडिओ बनवताना दिसते. आता गौतमीने सईच्या लावणीवर ठेका धरला आहे. "आलेच मी..." या गाण्यावर गौतमीने डान्स केला आहे. या व्हिडिओत ती "आलेच मी..." गाण्याच्या हुक स्टेप करताना दिसत आहे. गौतमीचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांसोबत सईदेखील थक्क झाली आहे. सईने गौतमीच्या या डान्स व्हिडिओवर कमेंट करत "विषय कट" असं म्हटलं आहे. 


दरम्यान, सई पहिल्यांदाच लावणी करत आहे. 'देवमाणूस' या सिनेमात ती लावणीवर थिरकताना दिसणार आहे. हा सिनेमा येत्या २५ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 'देवमाणूस'सोबतच सईचा 'गुलकंद' सिनेमाही १ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर 'ग्राऊंड झिरो' या हिंदी सिनेमात सई झळकणार आहे. हा सिनेमादेखील २५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: gautami patil dance video on aalech me lavani song sai tamhankar commented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.