पिचली माझी बांगडी! गौतमीच्या तालावर चिमुकल्याचा 'ताल', ठेका पाहून सगळेच अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 07:13 PM2024-04-11T19:13:37+5:302024-04-11T19:14:34+5:30

Gautami Patil Dance: गौतमी पाटील तिच्या अदांनी आणि नृत्यांनी चाहत्यांना घायाळ करत असते.

Gautami Patil has shared a video of her dancing with a child | पिचली माझी बांगडी! गौतमीच्या तालावर चिमुकल्याचा 'ताल', ठेका पाहून सगळेच अवाक्

पिचली माझी बांगडी! गौतमीच्या तालावर चिमुकल्याचा 'ताल', ठेका पाहून सगळेच अवाक्

आपल्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर प्रत्येकाच्या मनात घर करणारी गौतमी पाटील आज तरूणाच्या गळ्यातील ताईत बनली आहे. 'सबसे कातिल गौतमी पाटील', या वाक्याने तिला भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली. तरूणाईला आपल्या तालावर नाचवणारी गौतमी अप्रतिम नृत्यशैली सादर करून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही तिच्या अदांनी आणि नृत्यांनी चाहत्यांना घायाळ करत असते. आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये गौतमी तिची नृत्यशैली सादर करते. (Gautami Patil Dance Video) आजच्या घडीला ती एक नामांकित सेलिब्रिटी बनली आहे.

आता गौतमीने एका चिमुकल्यासोबत नृत्य करत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती पिचली माझी बांगडी या गाण्यावर ठेका धरत असून चिमुकल्याला देखील डान्स करण्याचा मोह आवरला नाही. गौतमीची ग्रामीण भागात क्रेझ भलतीच वाढल्याचे दिसते. ती चित्रपटांमध्ये देखील काम करत आहे. नेहमी नवनवीन फोटो, व्हिडीओ पोस्ट करून ती तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. (Gautami Patil Photo)

गौतमी पाटीलचे सोशल मीडियावर देखील खूप फॉलोअर्स आहेत. तिचे इंस्टाग्रामवर १ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिने एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामध्ये ती लहानग्यासोबत ठेका धरत असल्याचे दिसते. 

दरम्यान, विभत्स हावभाव तसेच आपल्या नजाकतीने प्रेक्षकांना भुरळ घालण्यात गौतमीने यश मिळवले. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. सोशल मीडियावर गौतमी नेहमीच सक्रिय असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते. 

Web Title: Gautami Patil has shared a video of her dancing with a child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.