"आज तू १० वर्षांचा झाला..." मोठ्या लेकाच्या वाढदिवशी जिनिलियाची भावुक पोस्ट, म्हणाली " I Love You रियान..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 12:02 PM2024-11-25T12:02:31+5:302024-11-25T12:03:57+5:30

जिनिलिया देशमुखने लाडका लेक रियानला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Genelia Deshmukh Emotional Birthday Wish Post For Her Baby Boy Riaan Deshmukh | Ritesh Deshmukh | "आज तू १० वर्षांचा झाला..." मोठ्या लेकाच्या वाढदिवशी जिनिलियाची भावुक पोस्ट, म्हणाली " I Love You रियान..."

"आज तू १० वर्षांचा झाला..." मोठ्या लेकाच्या वाढदिवशी जिनिलियाची भावुक पोस्ट, म्हणाली " I Love You रियान..."

Genelia Deshmukh : मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील लाडकी जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख. रितेश-जिनिलीयाला आज महाराष्ट्राचे दादा-वहिनी अशी एक वेगळी ओळख मिळाली आहे.दोघांकडे आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं.  अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर या दोघांनी फेब्रुवारी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. या जोडप्याला रियान व राहील अशी दोन मुलं आहेत. आज जिनिलीयाचा मोठा मुलगा रियान (Riaan Deshmukh) याचा वाढदिवस आहे.  रियानच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीयाने भावुक पोस्ट करीत आपल्या लाडक्या लेकाला शुभेच्छा दिल्या आहेत.

जिनिलीयाने २५ नोव्हेंबर २०१४ रोजी रियानला जन्म दिला. आज रियान त्याचा १० वाढदिवस साजरा करत आहे. याच निमित्ताने जिनिलिया हिने आपल्या लाडक्या लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने इन्स्टाग्रामवर रियानचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. जिनिलियानं लिहलं, "माझ्या बाळा काल वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला तुझ्या एकअंकी वयाचा अकडा आपण साजरा केला. आज तू १० वर्षांचा झाला आहेस.  दयाळू हृदयाचा आणि दररोज अधिक चांगले करण्याची इच्छाशक्ती असलेला मुलगा...  गेल्या दशकाची सुंदरता ही आहे की मी देखील आई होऊन १० वर्षे पूर्ण केली आहेत आणि तु मला स्वतःचं सर्वोत्तम व्हर्जन व्हायला शिकवलं".


जिनिलीया पुढे लिहिते, "आयुष्य म्हणजे वादळ संपण्याची वाट पाहत बसणे नाहीतर त्या पावसात नाचायला शिकणं आहे. पण तुझ्या १० वर्षात तू हे जगलास आणि मलाही ते जगायला शिकवलंस. आय लव्ह यू रियान... वाढदिवसाच्या शुभेच्छा बेबी बॉय... मी नेहमीच तुझी सर्वात मोठी चीअरलीडर असेल आणि तुझ्यावर प्रेम करण्याची मला मिळालेली एकही संधी सोडणार नाही", अशी पोस्ट जिनिलीया देशमुखने शेअर केली आहे. जिनिलीयाने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाच वर्षाव केला आहे.   चाहत्यांनी सुद्धा रियानला पुढच्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, जिनिलीयाच्या ( Genelia Deshmukh ) कामाबद्दल सांगायचं झालं तर, लवकरच ती आमिर खानच्या ‘सितारें जमीन पर’ चित्रपटात झळकणार आहे.  २०२२ मध्ये 'वेड' हा तिचा पहिला मराठी सिनेमा केला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. आता येत्या काळात रितेश-जिनिलीया पुन्हा एकत्र काम केव्हा करणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे.

Web Title: Genelia Deshmukh Emotional Birthday Wish Post For Her Baby Boy Riaan Deshmukh | Ritesh Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.