बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेनंतर जिनिलिया देशमुखची पोस्ट, म्हणाली, "पुढच्या पर्वासाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 10:46 AM2024-10-07T10:46:50+5:302024-10-07T10:47:23+5:30

रितेश आणि सूरज चव्हाणसोबत फोटो शेअर करत केली पोस्ट

Genelia Deshmukh s post after the grand finale of Bigg Boss Marathi season 5 | बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेनंतर जिनिलिया देशमुखची पोस्ट, म्हणाली, "पुढच्या पर्वासाठी..."

बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेनंतर जिनिलिया देशमुखची पोस्ट, म्हणाली, "पुढच्या पर्वासाठी..."

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा काल ग्रँड फिनाले झाले. बारामतीचा सूरज चव्हाण (Suraj Chavan) या पर्वाचा विजेता ठरला. सूरजने आपल्या साध्या स्वभावाने आणि 'झापूक झूपूक' अंदाजाने सर्वांचंच मन जिंकलं होतं. सूरज चव्हाण विजेता घोषित होताच एकच जल्लोष झाला. सर्वांनी सोशल मिडिया पोस्ट करत सूरजचं कौतुक केलं. महाराष्ट्राची लाडकी वहिनी जिनिलिया देशमुखनेही (Genelia Deshmukh) रितेशसाठी आणि सूरजसाठी पोस्ट शेअर केली आहे.

बिग बॉस मराठी सीझन ५ च्या फिनालेला जिनिलिया देशमुख सुद्धा हजर होती. रितेश देशमुखचा हा पहिलाच बिग बॉस होस्टिंगचा अनुभव होता. सूरज चव्हाण विजेता झाल्यानंतर बॅकस्टेज रितेशने त्याचं कौतुक केलं. जिनिलियाने सूरजसोबतचा फोटो शेअर करत लिहिले, "याला म्हणतात स्वप्न पूर्ण होणं. खूप मोठी स्वप्न बघ सूरज. ही बिग बॉस मराठीची ट्रॉफी तुझीच होती. रितेश काय होस्ट केलंस, शोला कुठच्या कुठे नेलंस, तू नेहमीच बेस्ट आहेस. केदार शिंदे आणि सर्व टीमचं अभिनंदन. मी पुढच्या पर्वासाठी आणखी वाट बघू शकत नाही."

बिग बॉस मराठीच्या या पर्वाने टीआरपीमध्ये अनेक रेकॉर्ड रचले. हा आतापर्यंतचा सर्वात जास्त टीआरपी मिळवलेला सीझन ठरला.या पर्वाची चांगलीच चर्चा झाली.  असं असतानाही शो १०० दिवसांऐवजी ७० दिवसातच संपवला. सूरज चव्हाण विजेता झाला तर अभिजीत सावंत रनर ठरला. 

Web Title: Genelia Deshmukh s post after the grand finale of Bigg Boss Marathi season 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.