जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 02:29 PM2024-10-05T14:29:33+5:302024-10-05T15:09:26+5:30

जिनिलीयाने नुकत्याच दिलेल्या मुलाखत रितेशबरोबरच्या ब्रेकअपचा किस्सा सांगितला.

रितेश-जिनिलीया हे मराठी आणि बॉलिवूड सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहे. महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

अनेक वर्ष डेटिंग केल्यानंतर रितेश आणि जिनिलीयाने २०१२ साली लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली.

नुकतीच जिनिलीयाने श्रेया घोडावत या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत जिनिलीयाने रितेशबरोबरच्या ब्रेकअपचा किस्सा सांगितला.

जिनिलीया म्हणाली, "रितेशने मला रात्री १ वाजताच्या सुमारास आपण इथेच थांबुया असा मेसेज केला आणि तो झोपून गेला".

"मी रात्री २.३० वाजता रितेशचा मेसेज वाचला. मला कळत नव्हतं नेमकं काय झालंय. सकाळी ९ वाजेपर्यंत मी स्वत:ची वाईट अवस्था करून घेतली होती".

"सकाळी रितेश उठला आणि त्याला माहीतही नव्हतं की त्याने रात्री असा मेसेज केला आहे. त्याने मला फोन केला आणि काय करतेस असं विचारलं".

"मी त्याला म्हटलं की मला नाही वाटत आपण बोललं पाहिजे. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. रितेशने मला विचारलं की काय झालंय?"

"तेव्हा मी त्याला त्याच्या मेसेजची आठवण करून दिली. पण त्याने १ एप्रिलला मला एप्रिल फूल बनवण्यासाठी तो मेसेज केला होता", असं जिनिलीयाने सांगितलं.

खरं तर रितेश -जिनिलीयाचं ब्रेकअप झालं नव्हतं. तर रितेशने एप्रिल फूल डे च्या दिवशी जिनिलीयाबरोबर हा प्रँक केला होता.