विधानसभा निवडणूक अन् गिरीश ओक यांची महत्त्वाची पोस्ट, मतदारांना विचारले दोन "भाबडे" प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 11:15 AM2024-11-17T11:15:29+5:302024-11-17T11:16:31+5:30

ज्येष्ठ अभिनेते गिरिष ओक यांनी मतदारांना दोन "भाबडे" प्रश्न विचारले आहेत. 

Girish Oak Shared Post Asked Two Questions To Voters | Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणूक अन् गिरीश ओक यांची महत्त्वाची पोस्ट, मतदारांना विचारले दोन "भाबडे" प्रश्न

विधानसभा निवडणूक अन् गिरीश ओक यांची महत्त्वाची पोस्ट, मतदारांना विचारले दोन "भाबडे" प्रश्न

 Girish Oak : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची  (Maharashtra Assembly Election 2024) धामधुम पाहायला मिळत आहे. यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आहे.  नेत्यांच्या प्रचारसभांनी वातावरण तापू लागलं आहे. निवडणुकीवर सर्व सामान्य व्यक्तीपासून ते कलकारांपर्यंत सर्वंच जण भाष्य करताना दिसून येत आहेत. यातच आता ज्येष्ठ अभिनेते गिरिष ओक यांनी मतदारांना दोन "भाबडे" प्रश्न विचारले आहेत. 


गिरीश ओक यांनी फेसबूकवर एक महत्त्वाची पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहलं, "मला पडलेले दोन भाबडे प्रश्न" पहिला - एक पार्टी १५०० देतेय दुसरी ३००० देणार म्हणतेय इतरही बरीच पैश्याची आश्वासनं दिली जातायत्, पण  हे देतायत/देणार कुठून आपल्या टोल,आयकर,जीएसटी मधूनच नं ? मग आपल्याला विश्वासात घेऊन विचारणं सोडाच पण सांगणं तरी. दुसरा - आणि हे जे एटीएम च्या किंवा इतर गाड्यांमधे पैसे पकडले जातायत् ते असे ॲाड संख्येत म्हणजे १ कोटी २७ लाख किंवा २ कोटी ७० लाख असे कसे आहेत. देणाराही असे का देतोय आणि घेणारालाही असे कसे हवे आहेत. की हे वरचे पैसे म्हणजे पोचवणाऱ्यांचा पोचवण्याचा मेहनाताना आहेत की पोचवताना ते पोचवणारेच लंपास करतायत  किंवा पकडणारे थोडे लंपास करून उरलेलेच सापडले असं सांगतायत. कोणी सांगेल का मला".

 

गिरीश ओक यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांचे हे दोन प्रश्न सध्या चाहत्यांचा चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तर त्याच दिवशी निकाल लागणार आहे. त्यानंतर काही दिवसातच राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे.

Web Title: Girish Oak Shared Post Asked Two Questions To Voters | Maharashtra Assembly Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.