‘ग्लॅमर’लाही मिळाला आपलेपणाचा ‘टच’
By Admin | Published: May 6, 2015 12:09 AM2015-05-06T00:09:30+5:302015-05-06T00:42:01+5:30
अगं बाई अरेच्चा २ या सिनेमाचा रौप्यमहोत्सव साजरा करण्यासाठी आपण सगळे पुन्हा येथेच भेटू अशा शुभेच्छा देते, अशा भावना चिरतरुण अभिनेत्री श्रीदेवी यांनी व्यक्त केल्या.
माझे महाराष्ट्रासोबत फार घट्ट ऋणानुबंध आहेत. या चित्रपटाची कथा अत्यंत साधी, सोपी आणि संवेदनशील आहे. निषादचे विशेष अभिनंदन करेन, की त्याला एवढ्या लहान वयात एवढा मोठा ब्रेक मिळाला. त्याचे कामही उत्तम झाले आहे. या सिनेमाचा रौप्यमहोत्सव साजरा करण्यासाठी आपण सगळे पुन्हा येथेच भेटू अशा शुभेच्छा देते, अशा भावना चिरतरुण अभिनेत्री श्रीदेवी यांनी व्यक्त केल्या. ‘इंग्लिश विंग्लिश’मधील साधी-सरळ शशी जशी सगळ््यांना भावली, त्याच धाटणीची शुभांगी असल्याने खास ‘अगं बाई अरेच्चा २’च्या म्युझिक लाँचसाठी श्रीदेवी यांना आमंत्रित करण्यात आल्याचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सांगितले. तर ‘अगं बाई अरेच्चा २’ यायला ११ वर्षे लागले, याचे कारण मला पहिल्या चित्रपटाचे कथानक जेथे संपले त्याला
धरूनच दुसरे कथानक तयार करणे योग्य वाटले नाही. त्याची मजा तेवढीच होती, परंतु खरी गंमत शीर्षकात आहे. जी कथा ऐकून ‘अंग बाई... अरेच्चा!’ असे उद्गार बाहेर पडतील, अशीच कथा आम्ही निवडली. या समान प्रतिक्रियेचा आणि भावनेचा धागा पकडून हा दुसरा भाग आणत आहोत.