‘गॉडफादर’ आता मराठीत

By Admin | Published: October 10, 2016 03:49 AM2016-10-10T03:49:07+5:302016-10-10T03:49:07+5:30

येड्यांची जत्रा, फोर इडियट्स, जस्ट गंमत, शिनमा अशा एकापेक्षा एक चित्रपटांचे दिग्दर्शक मिलिंद कवडे त्यांच्या आगामी चित्रपटाच्या तयारीला लागले

'Godfather' is now in Marathi | ‘गॉडफादर’ आता मराठीत

‘गॉडफादर’ आता मराठीत

googlenewsNext

येड्यांची जत्रा, फोर इडियट्स, जस्ट गंमत, शिनमा अशा एकापेक्षा एक चित्रपटांचे दिग्दर्शक मिलिंद कवडे त्यांच्या आगामी चित्रपटाच्या तयारीला लागले आहेत. ‘रायबा’ असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. गॉडफादर या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित हा चित्रपट असेल. या कादंबरीवर जगभरात ८०हून जास्त चित्रपट तयार करण्यात आले आहेत. बॉलिवूडमधील धर्मात्मा, दयावान, सरकार, गँग्ज आॅफ वासेपूर असे अनेक चित्रपट याच कादंबरीवर तयार करण्यात आले आहेत. आता याच कादंबरीवर मराठी चित्रपट मिलिंद बनवणार आहेत. या चित्रपटाविषयी लोकमत सीएनएक्सला मिलिंद कवडे सांगतो, की या कादंबरीवर जगभरात इतके चित्रपट बनवल्यामुळे या कांदबरीवर मराठी चित्रपट करण्याची इच्छा होती. ती ‘रायबा’ या चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. तसेच, या चित्रपटातील रायबा हा ग्रामीण भागातील असेल. या चित्रपटात प्रेक्षकांना ३० ते ३५ मराठी कलाकार पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट बिग बजेट असेल. इतक्या यशस्वी कादंबरीवर तयार झालेले चित्रपट बॉक्स आॅफिसवर यशस्वी झाले आहेत. त्यामुळे मराठीतील गॉडफादर म्हणजेच रायबा तयार करणे ही माझ्यावर मोठी जबाबदारी असल्याचे मिलिंदने यावेळी सांगितले.

Web Title: 'Godfather' is now in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.