'तारक मेहता का उल्‍टा चष्‍मा'मधील गोकुळधाम वासियांची सिंगापूरवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 07:15 AM2019-03-26T07:15:00+5:302019-03-26T07:15:00+5:30

'तारक मेहता का उल्‍टा चष्‍मा' प्रेक्षकांना सिंगापूरमधील नयनरम्‍य ठिकाणी घेऊन जाण्‍यास सज्‍ज झाले आहेत.

Gokuldham Nivaasis have a lifetime experience in Singapore on Taarak Mehta ka Ooltah Chashmah | 'तारक मेहता का उल्‍टा चष्‍मा'मधील गोकुळधाम वासियांची सिंगापूरवारी

'तारक मेहता का उल्‍टा चष्‍मा'मधील गोकुळधाम वासियांची सिंगापूरवारी

googlenewsNext

सोनी सब वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्‍टा चष्‍मा' प्रेक्षकांना सिंगापूरमधील नयनरम्‍य ठिकाणी घेऊन जाण्‍यास सज्‍ज झाले आहेत. या मालिकेत पोपटलालला एक अविश्‍वसनीय गिफ्ट मिळते आणि या गिफ्टचा उलगडा या मालिकेत होणार आहे.

गोकुळधाम निवासींसमोर गूढरहस्‍यासह हे साहसी कोडे उभे राहते. पोपटलाल विवाह होत नसल्‍याच्‍या दु:खात असताना त्याला एक पत्र मिळते. त्‍या पत्रामध्‍ये थॉमस कूकच्‍या ऑफिसला (ट्रॅव्‍हेल कंपनी) भेट देण्‍याचे आमंत्रण असते. अचंबित करणारी बाब म्‍हणजे त्‍यामध्‍ये संपूर्ण गोकुळधाम सोसायटीसाठी सिंगापूरची तिकिटे असतात. ही बातमी ऐकून सर्वांना खूप आनंद होतो. पण प्रश्‍न पडतो की हे गिफ्ट कोणी पाठवले आहे? येथूनच सिंगापूरच्‍या रहस्‍यमय व साहसी प्रवासाला सुरूवात होते. सर्वांसाठी जीवनातील ही अमूल्‍य संधी असते. पण त्‍यासोबत ते यामागे कोणाचा हात आहे त्‍याचा देखील शोध घेण्‍याचा प्रयत्‍न करतात. गोकुळधामवासिय या आयकॉनिक स्‍थळाला भेट देणार आहेत आणि तेथील साहसी खेळ व रोमहर्षक क्रूझचा अनुभव घेणार आहेत. गोकुळधाम वासियांचा सिंगापूर दौरा पाहणे कमालीचे ठरणार आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील जेठालाल आणि दया यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. मात्र गेल्या वर्षाभरापासून रसिकांची लाडकी दया ही 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधून गायब आहे. तिने सप्टेंबर २०१७ मध्ये मॅटरनिटी लिव्ह घेतली होती आणि यानंतर पाच महिन्यांनी ती मालिकेत येईल असे बोलले जात होते. २०१७  मध्ये दिशाने मुलीला जन्म दिला. त्यानंतर तरी ती मालिकेत कमबॅक करेल असे बोलले जात होते. नवरात्रीमध्ये मालिकेत कमबॅक करणार असे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. पण असे झाले नाही. त्यामुळे दिशाला मालिकेत परत येण्यासाठी आता ३० दिवस विचार करण्यास देण्यात आला असल्याचे वृत्त स्पॉटबॉय या वेबसाईटने नुकतेच दिले आहे. ३० दिवसांत दिशाने चित्रीकरण सुरू न केल्यास तिच्याऐवजी दुसऱ्या कलाकाराचा विचार करण्यात येणार आहे. 

Web Title: Gokuldham Nivaasis have a lifetime experience in Singapore on Taarak Mehta ka Ooltah Chashmah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.