Good News! अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर 'कुली नं १', 'दुर्गावती'सोबत होणार ९ बहुप्रतिक्षित चित्रपट रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 08:11 PM2020-10-09T20:11:57+5:302020-10-09T20:13:02+5:30
वरूण धवन व सारा अली खान अभिनीत 'कूली नं. १', राजकुमार राव अभिनीत 'छलांग', भूमी पेडणेकरचा 'दुर्गावती' या चित्रपटांचा समावेश आहे.
पूर्वी सादर केलेल्या जागतिक प्रीमिअर्सला मिळालेल्या भव्य यशानंतर अमेझॉन प्राइम व्हिडिओने आज ९ बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या नवीन यादीची घोषणा केली. या नवीन स्लेटमध्ये हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड व मल्याळम या ५ भारतीय भाषांमधील ९ रोमांचपूर्ण टायटल्सचा समावेश आहे. या नव्या घोषणेमुळे ज्यामुळे अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या एकूण डायरेक्ट-टू-सर्विस ऑफरिंगमध्ये विविध शैली व भाषांमधल्या १९ रोमांचक चित्रपटांपर्यंत वाढ होणार आहे.
पाच भारतीय भाषांमधील हे नवे ९ चित्रपट असून यामध्ये वरूण धवन व सारा अली खान अभिनीत 'कूली नं. १', राजकुमार राव व नुशरत भरूचा अभिनीत 'छलांग', भूमी पेडणेकर अभिनीत 'दुर्गावती', अरविंद अय्यर अभिनीत 'भीमसेना नल महाराजा' (कन्नड), आनंद देवराकोंदा अभिनीत 'मिडल क्लास मेलोडीज' (तेलुगु) , आर. माधवन अभिनीत 'मारा' (तमिळ) आणि वर्षा बोल्लम्मा, चेतन गंधर्व अभिनीत 'माने नंबर १३' यासोबत नुकतेच घोषणा करण्यात आलेला झकारिया मोहम्मदचा 'हलाल लव्ह स्टोरी' (मल्याळम) आणि सुरिया अभिनीत 'सूरराई पोट्रू (तमिळ) यांचा समावेश आहे.
कूली नं. १ (Coolie No. 1) (हिंदी), या चित्रपटाचा प्रिमिअर २५ डिसेंबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर सादर होणार आहे. पूजा एंटरटेन्मेंटच्या लोकप्रिय फ्रँचायझीवर आधारित 'कूली नं. १' हा कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन विनोदी चित्रपटांचा राजा डेव्हिड धवन यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये वरुण धवन, सारा अली खान, परेश रावल, जावेद जाफरी, जॉनी लिव्हर, राजपाल यादव यांनी काम केले आहे. वाशु भागनानी, जॅकी भागनानी आणि दीपशिखा देशमुख हे चित्रपटाचे निर्माते आहेत.
छलांग (Chhalaang) (हिंदी), या चित्रपटाचा प्रिमिअर १३ नोव्हेंबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर सादर होणार आहे. 'छलांग' हा राजकुमार राव, नुशरत भरूचा अभिनीत आणि हंसल मेहता यांचे दिग्दर्शन असलेला प्रेरणादायी सामाजिक विनोदी चित्रपट आहे. भूषण कुमार प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते अजय देवगण, लव्ह रंजन व अंकुर गर्ग हे आहेत.
दुर्गावती (Durgavati) (हिंदी), या चित्रपटाचा प्रिमिअर ११ डिसेंबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर सादर होणार आहे. अशोक यांचे दिग्दर्शन आणि भूमी पेडणेकर अभिनीत 'दुर्गावती' हा रोमांचपूर्ण, भयावह प्रवास दाखवणारा चित्रपट आहे. हा चित्रपट एका निरागस सरकारी अधिका-याच्या कथेला सादर करतो, जो शक्तिशाली दलांनी केलेल्या कटकारस्थानाला बळी पडतो. टी-सिरीज व केप ऑफ गुड फिल्म्सने हा चित्रपट सादर केला असून एबंडंशिया एंटरटेन्मेंट प्रॉडक्शनचा हा चित्रपट आहे.
हलाल लव्ह स्टोरी (Halal Love Story) (मल्याळम), या चित्रपटाचा प्रिमिअर १५ ऑक्टोबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर सादर होणार आहे. 'हलाल लव्ह स्टोरी' हा आगामी मल्याळम विनोदी चित्रपट आहे. झकरिया मोहम्मद यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत इंद्रजित सुकुमारन, जोजू जॉर्ज, शराफ यू धीन, ग्रेस अन्टोनी व सौबीन शाहिरसह पार्वती थिरूवोथू आहे.
भीमसेन नल महाराजा (कन्नड), या चित्रपटाचा प्रिमिअर २९ ऑक्टोबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर सादर होणार आहे. 'भीम' हा कार्तिक सरागुर यांचे दिग्दर्शन असलेला आगामी कन्नड कौटुंबिक मनोरंजनपूर्ण चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अरविंद अय्यर, आरोही नारायण, प्रियंका थिमेश, अच्युत कुमार व आद्या हे प्रमुख भूमिकेत आहेत.
सूरराई पोट्रू (SooraraiPottru) (तमिळ), या चित्रपटाचा प्रिमिअर ३० ऑक्टोबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर सादर होणार आहे. 'सूरराई पोट्रू' हा सुधा कोंगारा यांचे दिग्दर्शन असलेला आगामी तमिळ भाषेतील ऍक्शन/ड्रामा चित्रपट आहे. सुरिया अभिनीत या चित्रपटामध्ये अपर्णा बालमुरली, परेश रावल व मोहन बाबू प्रमुख भूमिकेत आहेत. सुरियाचे ३डी एंटरटेन्मेंट निर्मित या चित्रपटाचे सह-निर्माता गुनीत मोंगाचे सिख्या एंटरटेन्मेंट आहे. हा चित्रपट एअर डेक्कनचे संस्थापक कॅप्टन जी. आर. गोपीनाथ यांच्या जीवनावर लिहिण्यात आलेले पुस्तक 'सिम्प्ली फ्लाय'ची काल्पनिक आवृत्ती आहे.
माने नंबर १३ (कन्नड), या चित्रपटाचा प्रिमिअर १९ नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर सादर होणार आहे. 'माने नंबर १३' हा विवी कथिरेसन यांचे दिग्दर्शन असलेला आगामी हॉरर थ्रिलर चित्रपट आहे. कृष्णा चैतन्यचे श्री स्वर्णलता प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटामध्ये वर्षा बोल्लम्मा, ऐश्वर्या गौडा, प्रवीन प्रेम, चेतन गंधर्व, रामना आणि संजीव हे कलाकार आहेत.
मिडल क्लास मेलोडीज (तेलुगु), या चित्रपटाचा प्रिमिअर २० नोव्हेंबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर सादर होणार आहे .आनंद देवराकोंडा व वर्षा बोल्लम्मा अभिनीत 'मिडल क्लास मेलोडीज' हा गावातील मध्यमवर्गीयांच्या जन्मजात जीवनांना दाखवणारा विनोदी चित्रपट आहे. एका तरूण पुरूषाचे शहरामध्ये हॉटेलचे मालक असण्याचे स्वप्न आहे. विनोद अनंतोजू हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
मारा (तमिळ), या चित्रपटाचा प्रिमिअर १७ डिसेंबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर सादर होणार आहे. 'मारा' हा दिलीप कुमार यांचे दिग्दर्शन असलेला आगामी तमिळ भाषेतील रोमँटिक चित्रपट आहे. प्रमोद फिल्म्सचे प्रतीक चक्रवर्ती व श्रुती नल्लाप्पा हे चित्रपटाचे निर्माते आहे. या चित्रपटामध्ये माधवन व श्रद्धा श्रीनाथ प्रमुख भूमिकेत आहेत.