मीनलच्या फॅन्ससाठी खुशखबर !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2016 05:21 PM2016-11-15T17:21:40+5:302016-11-15T17:21:40+5:30

सध्या मराठी नाटकांची चलती असल्याचे दिसत आहे. एकापाठोपाठ एक मराठी नाटक रंगभूमीवर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अनेक ...

Good news for the fencing of mine! | मीनलच्या फॅन्ससाठी खुशखबर !

मीनलच्या फॅन्ससाठी खुशखबर !

googlenewsNext
्या मराठी नाटकांची चलती असल्याचे दिसत आहे. एकापाठोपाठ एक मराठी नाटक रंगभूमीवर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अनेक कलाकारदेखील रंगभूमीकडे आकर्षित झालेले दिसत आहे. आता हेच पाहा ना, स्वानंदी टिकेकर आणि सुमीत राघवन एकाच नाटकमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. नीरज शिरवईकर आणि सुदीप मोडक दिग्दर्शित “एक शून्य तीन” असे या नाटकाचे नाव असणार आहे. रहस्यमय आणि थरारक असे हे नाटक असणार आहे. या नाटकात अभिनेता सुमीत राघवन पत्रकार आणि रिसर्चरच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘बडी दूरसे आये है’ या लोकप्रिय मालिकेत व्यस्त असलेला हा अष्टपैलू अभिनेता ‘लेकुरे उदंड झाली’ या नाटकानंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर आपल्या अभिनयाची बहार उडवायला सज्ज झाला आहे. आणि त्याला साथ देत आहे ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मधली मीनल अर्थात स्वानंदी टिकेकर. ती या नाटकात कम्प्युटर एक्स्पर्टच्या भूमिकेत दिसणार आहे. या नाटकाचा शुभारंभ डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात करण्यात येणार आहे. सुमीत आणि स्वानंदी यांनी सोशल मीडियावर या नाटकाचे हटके पोस्टरदेखील अपलोड केले आहेत. या नाटकाविषयी लोकमत सीएनएक्सला स्वानंदी सांगते, ''या नाटकाची तालीम करताना खूप मजा आणि धमाल केली आहे.'' सुमीतसोबत काम करण्याचा अनुभवदेखील खूप भन्नाट होता. तो सीनिअर असल्यामुळे थोडी भिती वाटत होती. मात्र त्याने तसे जाणवूनदेखील दिले नसल्याचे स्वानंदीने सांगितले आहे. प्रत्येक प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारे हे नाटक असणार आहे. त्यामुळे हे नाटक नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार असल्याचेदेखील स्वानंदीने यावेळी सांगितले आहे.  

Web Title: Good news for the fencing of mine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.