अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या चाहत्यांसाठी खुशखबर!, मणिरत्नमच्या सिनेमात झळकणार ही जोडी?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 12:17 PM2024-11-08T12:17:39+5:302024-11-08T12:23:52+5:30
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) सध्या चर्चेत आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. ते दोघे लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याचे सांगितले जाते.
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र या वृत्ताला त्या दोघांनीही दुजोरा दिलेला नाही. दरम्यान आता त्यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. ते दोघे लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याचे सांगितले जाते. असे सांगितले जात आहे की, प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम एक हिंदी सिनेमा बनवत आहेत आणि त्यात ते ऐश्वर्या आणि अभिषेकला मुख्य भूमिकेत घेण्याची शक्यत आहे. यापूर्वी त्या दोघांनी मणिरत्नम यांच्या गुरू सिनेमात काम केलेले आहे.
मणिरत्नम यांच्या गुरू सिनेमात ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी काम केले होते. हा चित्रपट २००७ साली रिलीज झाला होता. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली होती. त्यानंतर मणिरत्नम यांनी त्या दोघांना पुन्हा 'रावण' सिनेमात कास्ट केले होते. टाइम्स नाउ डॉटच्या रिपोर्टनुसार, मणिरत्नम अभिषेक आणि ऐश्वर्यासोबत तिसरा सिनेमा बनवणार आहेत. त्यासाठी त्यांना इंटरेस्टिंग कथा मिळाली आहे.
अभिषेकला मणिरत्नमसोबत करायचे होते काम
मणिरत्नम यांच्यासोबत अभिषेकचा हा चौथा चित्रपट असेल. यापूर्वी त्याने 'युवा'मध्ये त्यांच्यासोबत काम केले होते. अभिषेकने एकदा झूमला मणिरत्नम यांच्यासोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल सांगितले होते, 'जेव्हा पहिल्यांदा 'युवा'साठी मला साइन करण्यासाठी ते आमच्या घरी आले तेव्हा मला वाटले की ते पप्पा अमिताभ बच्चन यांना साइन करायला आले आहेत.'
अभिषेकला याचा वाटतो अभिमान
अभिषेक पुढे म्हणाला, 'जेव्हा मला कळले की ते मला साइन करू इच्छितात तेव्हा मला खूप आनंद झाला. मणिरत्नम यांच्यासोबत काम करण्यासाठी कोणताही अभिनेता सर्वस्व देतो. मला खूप अभिमान आहे की त्यांनी मला आतापर्यंत त्यांच्या तीन चित्रपटासाठी पात्र मानले.
घटस्फोटाची होतेय चर्चा
गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक आणि ऐश्वर्या घटस्फोट घेणार असल्याची चर्चा होती. त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. अशीच एक अफवा २०१४ साली पसरली होती, जेव्हा अभिषेकने ती नाकारली होती. त्यावेळी त्याने ट्विट केले होते की, 'ठीक आहे, तर मला वाटतंय की मी घटस्फोट घेत आहे. मला कळवल्याबद्दल धन्यवाद! मी पुन्हा लग्न केव्हा करणार हे पण सांगाल का?