सोनू निगमच्या फॅन्ससाठी ही खुशखबर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 01:51 PM2018-08-08T13:51:22+5:302018-08-08T13:52:50+5:30
गायक सोनू निगम आणि 'आईटीडब्ल्यू प्लेवर्क्स' म्यूजिक टेलेंट मॅनेजमेंटने पंधरा शहरात “सोनू निगम लाइव्ह”ची घोषणा केली आहे. देश आणि परदेशातील पंधरा शहरात होणारा हा दौरा या वर्षी ऑक्टोबरला सुरू होणार असून पुढील वर्षी मार्च मध्ये समाप्त होईल.
सोनू निगम आज बॉलिवूडमधील सगळ्यात प्रसिद्ध गायकांपैकी एक आहे. त्याने आजवर अनेक हिट गाणी बॉलिवूडला दिली आहेत. त्याचे अनेक अल्बम देखील हिट झालेले आहेत. सोनूचे लाईव्ह गाणे ऐकायला मिळावे अशी त्याच्या सगळ्याच फॅन्सची इच्छा असते. आता त्याच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. सोनूची लाईव्ह गाणी त्याच्या फॅन्सना लवकरच ऐकायला मिळणार आहेत.
सोनू निगमचा लाइव्ह इव्हेंट लवकरच होणार असून त्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. सोनू जगभरातील अनेक शहरांमध्ये जाऊन कार्यक्रम करणार आहे.
गायक सोनू निगम आणि 'आईटीडब्ल्यू प्लेवर्क्स' म्यूजिक टेलेंट मॅनेजमेंटने पंधरा शहरात “सोनू निगम लाइव्ह”ची घोषणा केली आहे. देश आणि परदेशातील पंधरा शहरात होणारा हा दौरा या वर्षी ऑक्टोबरला सुरू होणार असून पुढील वर्षी मार्च मध्ये समाप्त होईल.
"'आईटीडब्ल्यू प्लेवर्क्स' म्यूजिक टेलेंट मैनेजमेंट" द्वारा आयोजित केल्या गेलेल्या दौऱ्यामध्ये सोनू निगम आणि काही अन्य प्रसिद्ध गायक त्यांची हिट गाणी सादर करणार आहेत. याविषयी सोनू निगम सांगतो, "आयटीडब्लू प्लेवॉर्क्स म्युझिकने “सोनू निगम लाइव्ह”ची घोषणा केल्याबद्दल मी खूप खूश आहे. माझी अनेक हिट गाणी रसिकांना ऐकायला मिळणार आहेत.
सोनू निगमने त्याच्या गायनाच्या करियरची सुरुवात खूपच लहान वयात म्हणजेच केवळ चौथ्या वर्षी केली. त्याने चार वर्षांचा असताना क्या हुआ तेरा वादा हे गाणं त्याचे वडील आगम कुमार निगम यांच्यासोबत स्टेजवर सादर केले होते. त्यानंतर तो नेहमीच वडिलांसोबत स्टेज परफॉर्मन्स देऊ लागला. १८ वर्षांचा असताना सोनू त्याच्या वडिलांसोबत मुंबईत आला आणि उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडे त्याने संगीत शिकायला सुरुवात केली. आज सोनू बॉलिवूडमधील सगळ्यात प्रसिद्ध गायकांपैकी एक आहे. त्याला त्याच्या गाण्यांसाठी आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सोनू आज केवळ एक गाणे गाण्यासाठी करोडो रुपये घेतो असे म्हटले जाते.
सोनूचे फॅन्स त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टला नक्कीच मोठ्या संख्येने हजेरी लावतील यात काही शंकाच नाही.