ना श्रद्धा, ना आलिया... 'या' दोन अभिनेत्रींना जगभरातील लोकांनी 2024 मध्ये सर्वाधिक Google Search केलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 05:10 PM2024-12-11T17:10:04+5:302024-12-11T17:10:43+5:30
बॉलिवूडमधील दोन अभिनेत्रींना जगभरातील लोकांनी 2024 मध्ये सर्वाधिक Google Search केलं आहे.
Google's 2024 Global Trends : लोक प्रत्येक सेकंदाला लोक Google वर काहीतरी शोधत राहतात. ज्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे. Google वर्षाअखेरीस कॅटेगरीनुसार काय शोधलं गेलं, हा डेटा शेअर केल्या जातो. आता 2024हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. भारतासाठी हे वर्ष खूप खास ठरले आहे. या वर्षी अनेक घटनांनी जगाचे लक्ष भारताने वेधून घेतले. यंदाही गुगलने 2024 मधील टॉप ट्रेंडिंग कॅटेगरीमधील डेटा शेअर केलाय.
गुगलने शेअर केलेल्या या डेटावरून 2024 मध्ये लोकांनी Entertainment मध्ये काय सर्च केलं आहे, हे दिसून येतंय. Entertainment मध्ये Actors या कॅटेगरीत लोकांनी दोन भारतीय अभिनेत्रीचं नाव आहे. या दोन अभिनेत्री श्रद्धा कपूर, आलिया भट किंवा पादुकोण नाहीत, तर हिना खान आणि निम्रत कौर या दोघी आहे. हिना खान (Hina Khan ) आणि निम्रत कौर ( Nimrat Kaur) या दोन अभिनेत्रींनी 2024 मध्ये सर्वाधिक शोधल्या गेलेल्या टॉप 10 जागतिक व्यक्तिमत्त्वांमध्ये स्थान मिळवलं आहे.
हिना खान ही तिच्या ब्रेस्ट कॅन्सर चर्चेत राहिली. तर निम्रत कौर ही ना कुठला चित्रपट, ना वेब सीरीज, ना लग्न. अभिषेक बच्चनसोबत जोडलं गेल्यानं तिनं सर्वांचं लक्ष वेधलं. निम्रत आणि अभिषेक हे दोघे डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. निम्रतमुळे विश्वसुंदरी ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा रंगली होती. मात्र, या अफवेवर दोन्हीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.